शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव आरोग्य अधिकाऱ्याच्या निवासस्थानी सोयाबीनचा साठा

By admin | Updated: April 26, 2017 00:06 IST

नेर तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रूग्णांना सेवा न देता चक्क सोयाबीनचा धंदा करतात,

गोदामाचे स्वरूप : नेरच्या सभापतींकडून भंडाफोड, चौकशीचे आदेश यवतमाळ : नेर तालुक्यातील बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रूग्णांना सेवा न देता चक्क सोयाबीनचा धंदा करतात, असा आरोप नेरच्या सभापती मनीषा गोळे यांनी मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला. यानंतर लगेच त्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. नेर तालुक्यातील बोरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी कधीच कर्तव्यावर उपस्थित नसतात, असा आरोप सभापती मनीषा गोळे यांनी केला. काही दिवसांपूर्वी या केंद्राला अकस्मात भेट दिली असता, ते गैरहजर आढळले. त्यांच्या सुटीचा अर्जही नव्हता. एवढेच नव्हे तर ते चक्क सोयाबीनचा धंदा करतात, असा थेट आरोप त्यांनी केला. त्यांच्या शासकीय क्वॉर्टरमध्ये आजही चक्क सोयाबीन भरून असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून सभागृहात एकच खळबळ उडाली. अध्यक्ष माधुरी आडे, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मान्य केले. तसेच लगेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. चौकशीअंती त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देशही सिंगला यांनी दिले. आरोग्य विभागावरील चर्चेत स्वाती येंडे यांनी लोणबेहळ येथील आरोग्य केंद्रात पाणी टंचाई असल्याने रूग्णांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे सांगितले. लाख रायाजी येथील पाईप लाईन फुटल्याने दूषित पाणी नळाव्दारे घरोघरी पोहोचून अनेक ग्रामस्थांना डायरियाची लागण झाल्याचे तेथील महिला सदस्याने सांगितले. काही ठिकाणी चक्क सफाई कर्मचारीच डॉक्टरची भूमिका बजावत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. जिल्ह्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची १६ पदे असून त्यापैकी सहा पदे रिक्त असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी के. झेड. राठोड यांनी सभेत सांगितले. (शहर प्रतिनिधी) ‘सीईओ’ समस्या हसण्यावरी नेतात शिवसेनेचे सदस्य श्रीधर मोहोड यांनी चर्चेदरम्यान, सदस्यांचे अनेक प्रश्न, समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी हसण्यावरी नेत असल्याचा आरोप केला. अनेक सदस्य नवखे असल्याने त्यांना व्यवस्थित समस्या मांडता येत नसतील, मात्र त्यांची तळमळ महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे प्रशासनाने जनतेच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.