शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

आश्वासक पावसाने पेरणी सुरू

By admin | Updated: June 20, 2016 02:10 IST

जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्याचे शिवार आनंदाने न्हावून निघाले असून या आश्वासक पावसाने जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू झाली.

जिल्ह्यात ३२ मिमी पाऊस : शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य यवतमाळ : जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळताच शेतकऱ्याचे शिवार आनंदाने न्हावून निघाले असून या आश्वासक पावसाने जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू झाली. शनिवारी रात्री जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस कोसळला. मान्सून सक्रिय झाल्याने आता हमखास पाऊस बरसणार याची खात्री झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.सुरुवातीला हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवित मान्सून वेळेवर येण्याचे भाकित केले होते. मात्र हवामानातील बदलाने मान्सूनची गती मंदावली. परिणामी रोहिणीतील अवकाळी पावसानंतर अर्धे मृग नक्षत्र कोरडे गेले होते. धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली होती. हवामान खातेही दररोज वेगवेगळा अंदाज वर्तवित होते. अशातच शनिवारी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. हवामान खात्यानेही हा मान्सूनचा पाऊस असल्याचे शिक्कामोर्तब केले. जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस बरसला. सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात नोंदविला गेला. जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊस झाला असून आतापर्यंत ७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांनी रविवारी पेरणीची लगबग सुरू केली. कपाशी, सोयाबीन, मूग, तूर, उडीद आदी पिकांची लागवड केली जात आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसाने नदी, नाले खळखळून वाहू लागले आहे. जलस्रोतात वाढ झाली असून पाणीटंचाईलाही काही अंशी दिलासा मिळाला आहे. तसेच नागरिकांची असह्य उकाड्यापासून सुटका झाली. लांबलेल्या पावसाने नऊ लाख हेक्टरवरील पेरणी खोळंबली होती. तर ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली ते शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. शनिवारच्या पावसाने धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. मात्र काही भागात झालेल्या जोरदार पावसाने बियाणे दडपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु काही का असे ना या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. येत्या काही दिवसात शेतात शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न फुलणार हे तेवढेच खरे. (शहर वार्ताहर)सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात ८५ मिमी यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी सरासरी ३२ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस आर्णी तालुक्यात ८५ मिमी कोसळला. यवतमाळ २८ मिमी, बाभूळगाव २२ मिमी, कळंब १२ मिमी, दारव्हा २७ मिमी, दिग्रस ५४ मिमी, नेर ३० मिमी, पुसद ५४ मिमी, महागाव ७४ मिमी, उमरखेड ४२ मिमी, केळापूर १४ मिमी, राळेगाव ९ मिमी, घाटंजी ५७ मिमी, मारेगाव ८ मिमी आणि झरी तालुक्यात ४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.