शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्यात पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 21:40 IST

तालुक्यात रोहिणी आणि मृग नक्षत्राने दगा दिला. मात्र आर्द्राने हजेरी लावल्याने बहुतांश पेरण्या आता पूर्णत्वास गेल्या आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आर्द्रा नक्षत्रात पावसाने तालुक्यात हजेरी लावली. अल्पश: पावसावर ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. आता शेतात कोवळे अंकुर दिसू लागले आहे.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षाच : शेतकऱ्यांना सतावतेय पुन्हा दुष्काळाची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात रोहिणी आणि मृग नक्षत्राने दगा दिला. मात्र आर्द्राने हजेरी लावल्याने बहुतांश पेरण्या आता पूर्णत्वास गेल्या आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.आर्द्रा नक्षत्रात पावसाने तालुक्यात हजेरी लावली. अल्पश: पावसावर ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. आता शेतात कोवळे अंकुर दिसू लागले आहे. त्यांच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खरीप हंगामाची भिस्त असलेले दोन नक्षत्र कोरडे गेल्याने आधीच शेतकरी दुष्काळाच्या सावटात आहे. तब्बल महिनाभर पेरण्या खोळंबल्या होत्या. यावर्षी पेरणी लांबली. मात्र आर्द्रा नक्षत्राने दिलासा दिल्याने किमान पेरणी पूर्णत्वास गेली आहे.आर्द्रा नक्षत्रात शेवटच्या चरणात तालुकयात तुरळक पाऊस झाला. त्याच्याच भरवशावर शेतकºयांनी पेरणी आटोपली. आता मात्र केवळ ढगाळी वातावरण दिसत आहे. पावसाचा पत्ता नाही. आलाच तर एखादी सर कोसळते. मात्र दमदार पाऊस अद्याप झाला नाही. परिणामी जमितीन अद्याप खोलवर ओलावा पोहोचला नाही. जमिनीत ओलावा नसल्याने अंकुरलेल्या बियाण्याची वाड खुंटण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळेच शेतकरी बांधव दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.नदी, नाले अद्याप कोरडेचदरवर्षी जुलै महिन्यात तालुक्यातील सर्व नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहतात. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने अद्याप तालुक्यातील ओढे, नाले, नदी कोरडे आहेत. विहिरींमध्येही ठणठणाट आहे. जलस्त्रोत कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह मुक्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. जुलै अखेरपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास पिकांवर परिणाम होऊन उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीची भिती जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे.

टॅग्स :agricultureशेती