शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

महागावात ३० हजार हेक्टर पेरणी उलटली

By admin | Updated: July 23, 2014 00:14 IST

लांबलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील ३० हजार हेक्टरवरील पेरणी उलटली असून बी-बियाणे आणि खतांचा शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तसेच उशिरा झालेल्या पेरणीने २० टक्के

रितेश पुरोहित - महागाव लांबलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील ३० हजार हेक्टरवरील पेरणी उलटली असून बी-बियाणे आणि खतांचा शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तसेच उशिरा झालेल्या पेरणीने २० टक्के उत्पादनाही घट येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लागवड क्षेत्राच्या निम्म्या क्षेत्रात शेतकऱ्यांंंना दुबार पेरणी करावी लागणार आहे. महागाव तालुक्यात ८० हजार हेक्टर लागवड लायक क्षेत्र असून ३० हजार शेतकरी आहे. गेल्या कित्येक वर्षात यंदा प्रथमच एक महिन्यानंतर पेरण्या उशिराने कराव्या लागल्या. साधारणत: १५ ते २५ जूनदरम्यान तालुक्यातील पेरण्या आटोपतात. मात्र उशिरा आलेल्या पावसाने १७ जुलै ते २२ जुलैदरम्यान पेरण्या करण्यात आल्या. त्यात कापूस ३१ हजार १७८ हेक्टर, सोयाबीन १९ हजार १५० हेक्टर, तूर ४ हजार १० हेक्टर, उडीद ६३० हेक्टर, मूग ६०७ हेक्टर, ज्वारी ३ हजार ४६० हेक्टर, हळद ३१८ हेक्टर, ऊस ६५० हेक्टर आणि भाजीपाला २३० हेक्टर लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी ६० हजार ५८७ हेक्टरवर पेरणी केली. मात्र पेरणीनंतर पुरेसा पाऊस झाला नाही. वाढत्या तापमानाने बियाणे सुकले. अंकुरलेल्या बियाण्यांंना मोड आली. साधारणत: ३० हजार हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दीड ते दोन कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. तसेच उशिरा पेरणीमुळे उत्पादनात २० टक्के घट येण्याची शक्यता आहे.महागाव तालुक्यात आतापर्यंत केवळ १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तुषार सिंचन सारखा पाऊस कोसळत आहे. नदी, नाले कोरडे असून सिंचन तलावातही पाण्याचा थेंब नाही. अशा स्थितीत शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाने हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना या परिस्थितीत भाजीपाला व इतर पिकांकडे वळावे लागणार आहे. एकंदरित यावर्षी उशिरा आलेल्या पावसानेही शेतकरी हवालदिल झाला आहे.