शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:04 IST

शेतकरी आत्महत्या, दारुबंदी, आतंकवाद, सावकारी जाचाचा बळी ठरलेला शेतकरी, बेटी बचाव-बेटी पढाव, वृद्धाश्रम असे सामाजिक समस्यांवरील विलोभनीय देखावे साकारुन मंडळाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे.

ठळक मुद्दे‘झाडे लावा-झाडे जगवा’चा संदेश : दारव्हा येथील ओम गणेश मंडळातर्फे प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : येथील अंबिकानगरातील ओम गणेश मंडळाने यावर्षी ‘झाडे लावा-झाडे जगवा’ असा संदेश देणाऱ्या गणरायाची स्थापना केली. गणेशोत्सवातून सामाजिक बांधीलकी जपणाºया मंडळाचा हा देखावा शहरात भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला.ओम गणेश मंडळ दरवर्षी सामाजिक संदेश देणारे विविध प्रकारचे देखावे सादर करते. यापूर्वी शेतकरी आत्महत्या, दारुबंदी, आतंकवाद, सावकारी जाचाचा बळी ठरलेला शेतकरी, बेटी बचाव-बेटी पढाव, वृद्धाश्रम असे सामाजिक समस्यांवरील विलोभनीय देखावे साकारुन मंडळाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. सध्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. हा समतोल कायम राखण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी गणेशोत्सवासारखा धार्मिक उत्सव चांगले निमित्त ठरु शकतो.यावर्षी ओम गणेश मंडळाने ‘झाडे लावा-झाडे जगवा’ असा एक नवीन सामाजिक उपक्रम हाती घेतला. त्यासाठी खुद्द श्री गणेश वृक्षारोपण करीत आहे, तर त्यांचे वाहन उंदीर वृक्षाला पाणी देत असल्याचा देखावा साकारला. यातून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. मंडळाचे अध्यक्ष जीवन काळे, उपाध्यक्ष संदीप शिले, सचिव स्वप्निल राठोड, कोषाध्यक्ष प्रवीण राऊत, विलास शिले, निखील मडसे, दिनेश वानखेडे, किशोर जवके, अमोल ठोंबरे, किशोर राऊत, रुपेश शिले, अभिषेक गावंडे, महेश दंडे आदींच्या संकल्पनेतून हा देखावा साकारला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या मंडळाचे कौतुक होत आहे. इतर मंडळांनी आदर्श घेण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019