शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कुस्तिगीर संघाची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:42 IST

जिल्हा कुस्तिगीर संघ आणि बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातून हज येथे जाणारे २३ यात्रेकरू आणि समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी हा कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्देहज यात्रेकरू व सामाजिक योगदान देणाऱ्यांचा सत्कार : बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवाराचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा कुस्तिगीर संघ आणि बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातून हज येथे जाणारे २३ यात्रेकरू आणि समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कीर्ती गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, प्राचार्य शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, जिल्हा कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर आदी उपस्थित होते.जिल्ह्यातून यावर्षी २३ व्यक्ती हजची यात्रा करणार आहे. त्यांचा कुस्तिगीर संघातर्फे शाल व हार घालून सत्कार करण्यात आला. शेख गुलाब शेख इस्माईल, अब्दुल जाकीर करीमभाई, मोहम्मद याकुब मो. आसिफ अली, शेख शैफुद्दिन शेख हाफिजोद्दिन, अ. सईदभाई अ. हमीद, शेख अहेमद शेख शब्बीर, जमील खान साहब, इस्माईल भाई, रमजानभाई सोलंकी, इकबालभाई या हज यात्रेकरूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उन्हाळ्यात यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना नि:शुल्क पाणीवाटप करणारे निट्टू तिवारी, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणेच्या संचालकपदी निवड झालेले विलास महाजन, रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनचे नवनियुक्त अध्यक्ष अतुल मांगुळकर यांनाही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कीर्ती गांधी, किशोर दर्डा, बाळासाहेब मांगुळकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन शेख जमील शेख गुलाब यांनी, तर आभार बाळासाहेब मांगुळकर यांनी मानले.कार्यक्रमासाठी नगरसेवक उध्दवराव साबळे, प्रताप पारसकर, अनिल पांडे, सुरेश जयसिंगपुरे, उद्धव बाकडे, रवी ढोक, दीपक ठाकूर, अफसर बेग कादीर बेग, मुन्नवर शाह, मिर्झा रियाज बेग, बाबाभाई रऊफ मिर्झा, सैयद कय्यूम, अबरार खान, कादिर बेग मिर्झा यांच्यासह जिल्हा कुस्तिगीर संघाचे सदस्य व बाळासाहेब मांगुळकर मित्र परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेतला.