शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुसद जंगलात तस्करांचा मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 21:22 IST

घनदाट जंगलासाठी आणि मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील जंगलात मराठवाड्यातील तस्करांचा मुक्तसंचार सुरू आहे.

ठळक मुद्देसागवानाची कत्तल : गस्तीच्या नावावर वनविभागाचा केवळ फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : घनदाट जंगलासाठी आणि मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील जंगलात मराठवाड्यातील तस्करांचा मुक्तसंचार सुरू आहे. हिंगोली परिसरातून खंडाळा मार्गे तस्कर जंगलात शिरत असून दिवसाढवळ्या सागवानाची कत्तल करीत आहे. गस्तीच्या नावावर वन अधिकारी आणि कर्मचारी केवळ फेरफटका मारत आहे, तर ठिकठिकाणी असलेले वनउपज तपासणी नाकेही कुचकामी ठरले आहे.पुसद तालुक्याच्या चारही बाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलात सागवानासह विविध बहुमूल्य वृक्ष आहे. या जंगलातील सागवानावर सध्या मराठवाड्यातील तस्करांचा डोळा आहे. स्थानिकांच्या मदतीने तस्कर जंगलात कटाई करतात. वाहनांद्वारे रात्रीच्यावेळी सागवानाची वाहतूक केली जाते. अनेक तस्करांजवळ स्वयंचलित आरामशीन असून त्याद्वारे अवघ्या काही मिनिटात सागवानाचे मोठे झाडही तोडले जाते. या सागवानाचे तुकडे करून वाहनात भरून त्यावर गौण खनिज अथवा वैरण टाकून मराठवाड्यात नेले जाते. गत काही दिवसांपूर्वी उमरखेड येथे पोलिसांनी एका सागवान तस्कराला पकडले होते. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सागवान जप्त करण्यात आले होते. त्याने आपल्या कबुलीत पुसद जंगलातील सागवान असल्याचे सांगितले होते. चौकशी झाली होती. ना तस्कर मिळाले ना ठोस कारवाई झाली.एकीकडे शासन वृक्ष लागवडीवर भर देत आहे, तर दुसरीकडे तस्कर खुलेआम सागवानाची तोड करीत आहे. अनेकदा सागवान तोडीच्या नावाखाली वन्यप्राण्यांची शिकारही केली जाते. स्थानिक मंडळी रोजगाराच्या आशेने या तस्करांना साथ देतात. जंगलात कुणीही फेरफटका मारला तर सागवानाची तुटलेली थुटे दिसून येतात. परंतु वन विभागाला सागवान तस्करी दिसत नाही. गत काही वर्षांपासून हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे. परंतु कुणाचेही लक्ष नाही. वृक्षप्रेमी केवळ वृक्षरोपणाच्या नावाखाली प्रसिद्ध मिळवत आहे. परंतु जंगलात होणाºया वृक्षतोडीबद्दल कुणीही बोलायला तयार नाही.वनउपज तपासणी नाके कुचकामीजंगलातून होणारी सागवान तस्करी रोखण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी वनउपज तपासणी नाके उभारले आहेत. या नाक्यांवर कर्मचाºयांची कागदोपत्री नियुक्ती केलेली असते. काही अपवाद वगळता रात्रीच्या वेळी कोणत्याही नाक्यावर कर्मचारी दिसत नाही. याच संधीचा फायदा तस्कर घेत आहे, तर काही ठिकाणी तस्कर आणि वन अधिकारी-कर्मचाºयांचे साटेलोटे असते. यातूनही वाहन बिनबोभाट मराठवाड्यात रवाना केले जाते.