शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

तस्करीने वनखाते हादरले

By admin | Updated: September 24, 2014 23:42 IST

पुसद वनविभागांतर्गत सुरू असलेल्या सागवान तस्करीने वन खात्यातील तमाम अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. तस्करांपुढे वन प्रशासनाने हात टेकविले आहे.

पुसद : पुसद वनविभागांतर्गत सुरू असलेल्या सागवान तस्करीने वन खात्यातील तमाम अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. तस्करांपुढे वन प्रशासनाने हात टेकविले आहे. अखेर यातून मार्ग काढण्यासाठी मंगळवारी विदर्भ- तेलंगाणा-मराठवाडा सीमावर्ती क्षेत्र अधिकाऱ्यांची मेगा बैठक पार पडली. पुसद वनविभागांतर्गत उपवनसंरक्षक एस.व्ही. आलुरवार यांच्या नेतृत्वात वन खात्याची यंत्रणा काम करते. परंतु सध्या आलुरवार आणि कंपनीच्या नियंत्रणाबाहेर वन विभागाचा कारभार गेला आहे. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या सर्वच तालुक्यांमध्ये सागवान तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एखाद दोन प्रकरणात ही तस्करी उघड होत असली तरी त्यात वन खात्याचे फार श्रम नाहीत. नियोजन चुकल्याने, वाहन फसल्याने, वाहन बंद पडल्याने, तांत्रिक अडचण आल्याने या तस्करांचा पर्दाफाश झाला. वन खात्याच्याच मूक संमतीने व हलगर्जीपणामुळे अवैध वृक्ष तोड वाढली आहे. वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी तालुका मुख्यालयी राहून अजब पद्धतीने जंगल संरक्षण करीत असल्याने तस्करांना रान मोकळे झाले आहे. वन यंत्रणा सायंकाळनंतर जंगलात येतच नाही, याची खात्री पटल्याने तस्कर पहाटेपर्यंत जंगलाचा ताबा घेतात. विशिष्ट यंत्राद्वारे मोठमोठ्या वृक्षांची तोड करून सागवान सिमापार नेले जात आहे. या सागवान तस्करीने वन खात्याची यंत्रणा चांगलीच हादरली आहे. या पार्श्वभूमीवर पुसदचे डीएफओ आलुरवार, आदिलाबादचे वनसंरक्षक डॉ. शेखर रेड्डी यांच्या नेतृत्वात विदर्भ-तेलंगाणा-मराठवाड्याच्या सीमेवरील गावात मंगळवारी बैठक घेण्यात आली. त्यात तीनही प्रांतातील सहायक वनसंरक्षक, वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल उपस्थित होते. पुसद विभागातील जंगलांमध्ये मराठवाड्यातील तस्कर आढळून आले आहे. या तस्करांना पायबंद कसा करायचा यावर बैठकीत चिंतन करण्यात आले. विदर्भात सागवान तोड करून चोरट्या मार्गाने अथवा नदीच्या आश्रयाने लाकूड मराठवाड्यात, तेलंगाणात नेले जाते. त्याला प्रतिबंध घालण्याचे बैठकीत ठरले. वनसंरक्षणासाठी ही बैठक घेतली गेल्याचे पुसदचे डीएफओ सुरेश आलुरवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (वार्ताहर)