शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
3
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
4
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
5
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
6
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
7
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
8
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
9
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
10
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
11
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
12
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
13
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
14
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
15
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
16
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
17
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
18
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
19
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
20
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  

पांढरकवडा शहरात विना परवाना वाहनांची धूम

By admin | Updated: May 15, 2016 02:03 IST

लोकसंख्येबरोबर शहर व तालुक्यात वाहनांचीही संख्याही प्रचंड वाढत आहे. तथापि, वाहन आणि परवानाधारकांच्या संख्येत प्रचंड तफावत दिसून येत आहे.

अल्पवयीन चालक : आरटीओ, पोलिसांचे दुर्लक्षपांढरकवडा : लोकसंख्येबरोबर शहर व तालुक्यात वाहनांचीही संख्याही प्रचंड वाढत आहे. तथापि, वाहन आणि परवानाधारकांच्या संख्येत प्रचंड तफावत दिसून येत आहे. त्यामुळे विना परवाना वाहनधारकांची धूम सुरू आहे. अशी वाहने अपघाताला निमंत्रण देत आहेत.हल्ली बहुतांश नागरिकांकडे दुचाकी आली आहे. ग्रामीण भागातही दुचाकी घरोघरी पोहोचली आहे. मात्र वाहन चालक परवाना काढण्यासाठी अनेकांची परवड होत आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक चक्क परवाना काढण्याच्या भानगडीतच पडत नाही. तेथून वाहतूक नियमांची पायमल्ली सुरू होते. पांढरकवडा शहरात वाहनांची संख्या प्रचंड झाली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रस्ते वाहनांनी गजबजलेले दिसतात. शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच गल्लीबोळातही वाहनांचे अतिक्रमण दिसून येते. सध्या वाहन घेण्यासाठी कर्ज पुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे. फायनान्स कंपन्या कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकाकडे दुचाकी आली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने कुणीही, कुठेही वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. वाहनांची संख्या एवढी वाढली असताना पार्किंगची मात्र कुठेच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्यावर कुठेही आडवेतिडवे वाहन उभे केले जाते. वाहतूक पोलीस अशा वाहनांवर जुजबी दंडात्मक कारवाई करून सोडून देतात. त्यामुळे वाहनधारकांचे मनोबल चांगलेच वाढले आहे. शहर आणि ग्रामीण भागात अनेक अल्पवयीन मुले धूम स्टाईलने वाहने चालवून शहराचे स्वास्थ बिघडविण्यात अग्रेसर आहेत. भरधाव वाहनाने अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकतात. असे वाहन अगदी जवळून गेले, की क्षणभर कुणालाही अंधारी आल्याशिवाय राहात नाही. विना परवानाधारक चालक सुसाट वेगाने वाहन चालविताना दिसून येतात. त्यातून अनेकदा अपघात घडतात. (शहर प्रतिनिधी)