शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२०० सागवान वृक्षांची कत्तल

By admin | Updated: July 8, 2014 23:41 IST

एक, दोन नव्हे तर तब्बल दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर तस्करांनी कुऱ्हाड चालविली. सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकूडसाठा वाहनाद्वारे लंपास केला. हा गंभीर प्रकार हिवरी

आंध्र प्रदेशात तस्करी : राखीव वनातून ४० लाखांचे लाकूड लंपासयवतमाळ : एक, दोन नव्हे तर तब्बल दोनशेवर परिपक्व सागवान वृक्षांवर तस्करांनी कुऱ्हाड चालविली. सुमारे ४० लाख रूपये किमतीचा ६० घनमिटर लाकूडसाठा वाहनाद्वारे लंपास केला. हा गंभीर प्रकार हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर, मनदेव, किन्ही आणि खरद राखीव वनात उघडकीस आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करी होण्याची ही यवतमाळ वनवृत्तातील बहुधा पहिलीच घटना असावी. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी यवतमाळ वनविभागात येणाऱ्या हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर, मनदेव, किन्ही आणि खरद शिवारात तस्करांनी २०० वर परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल केली. तसेच काही वरवर परिपक्व दिसत असल्याने त्यांच्यावरही कुऱ्हाड चालविण्यात आली. मात्र अर्धाभाग कापल्यानंतर ते पोकळ असल्याचे निदर्शनास येताच ते वृक्ष न कापता तसेच सोडून देण्यात आले. हा गंभीर प्रकार स्थानिक नागरिक व गुराख्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती हिवरी वनपरिक्षेत्रातील क्षेत्रसहायक, वनरक्षक आणि चौकीदारांना दिली. मोक्का पाहणीत दोनशेवर सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालल्याचे आणि लाखो रूपयांच्या लाकडाची तस्करी झाल्याचे पाहून वनकर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तातडीने संशयितांची व चोरट्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी एक क्षेत्रसहाय्यक आंध्र प्रदेशातील आदिलाबादपर्यंत जावून आला. त्यानंतर त्याने घटनेची आणि संशयिताची माहिती हिवरी वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एच. मोहिते यांना दिली. तसेच चौकशी करण्यासाठी परवानगी देण्याची गळही घातली. मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते यांनी त्यांना चौकशीची परवानगी न देता हा प्रकार दडपण्यास बाध्य केले. त्यामुळे ही कत्तल उघडकीस येवून अनेक दिवस उलटल्यानंतरही कुठलीच कारवाई झाली नाही. हा प्रकार स्थानिकांनी प्रसार माध्यमांच्या लक्षात आणून दिला. याची कुणकूण लागताच बिंग फुटून कारवाई होईल, या भीतीने आरएफओ मोहिते यांनी तस्करी झालेल्या वृक्षांच्या थूटावर हॅमर मारून तत्काळ पीओआर फाडण्याचे आदेश दिले. त्यावरून ६ आणि ७ जुलैला कत्तलीची साक्ष देणाऱ्या सागवान वृक्षांच्या थूटांवर हॅमर मारले. तसेच हॅमर मारून घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना दिली. त्यावरून ८ जुलैला यवतमाळ वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा तेथे धडकले. त्यांनी हा गंभीर प्रकार पाहून आरएफओ मोहिते आणि वन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. २०० वर सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठा लंपास करणे हे काही एक दोन दिवसाचे काम नाही. (स्थानिक प्रतिनिधी) क्षेत्रसहायकासह चौकीदारावर संशयाची सुई हिवरी वनपरिक्षेत्रात कार्यरत एक क्षेत्रसहाय्यक नुकताच यवतमाळ वनपरिक्षेत्रातून तेथे बदलीवर गेला. यवतमाळा वनपरिक्षेत्रात रूजू होण्यापूर्वी तो हिवरी वनपरिक्षेत्रातच कार्यरत होता. या दोन वनपरिक्षेत्रा पलिकडे त्याने कुठेही सेवा दिली नाही. त्याचे तस्करांशी आर्थीक हितसंबंध असल्याचे अनेकदा उघड झाले. काही महिन्यांपूर्वीच हिवरी वनपरिक्षेत्रात रूजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते यांनाही त्याने कचाट्यात घेतले आहे. शिवाय दोन खास चौकीदारही त्याच्या या गोरखधंद्यात सामील असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.