शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

वॉटरकप स्पर्धेत सहा तालुके उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:48 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त, अशी जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचे नियोजन आहे.

ठळक मुद्देगावांना सहभागाचे आवाहन : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कचेरीत आढावा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त, अशी जिल्ह्याची नकारात्मक ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याचे नियोजन आहे. वैशिष्ट्य म्हणजे राज्यात या स्पर्धेत सर्वाधिक तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले हक्काचे पाणी कमाविण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि पाणी फाऊंडेशनच्यावतीने वॉटर कप स्पधेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जयंत देशपांडे, संदीपकुमार अपार, स्वप्नील कापडनीस, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सुभाष मानकर आदी उपस्थित होते.गतवर्षी या स्पर्धेत जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश होता. यावर्षीच्या स्पर्धेत राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी आणि दारव्हा या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सहा तालुक्यातील १०८ गावांचा समावेश जलयुक्त शिवारमध्ये आहे. त्यामुळे ही १०८ गावे १०० टक्के सहभागी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यवतमाळचा वॉटर कप यावर्षी निश्चितच वेगळा असेल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप संदर्भात यावषीर्ची पहिली बैठक यवतमाळमध्ये होत आहे. या माध्यमातून चांगली माणसे जोडून चांगल्या समाजाची निर्मिती हेच ध्येय आहे. डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याला एक चांगले नेतृत्व लाभले आहे. प्रशासन, समाज आणि पाणी फाऊंडेशनचे समन्वयक यांच्या प्रयत्नातून यवतमाळ जिल्हा या स्पर्धेत प्रथम येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामविकास दूत, पाणी फाऊंडेशनचे समन्वयक आदी उपस्थित होते.