शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पार्डीत लग्न घरातूनच निघाल्या सहा तिरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:36 IST

ज्या घरातून आनंदाने नवरदेवाची वरात निघणार होती, त्याच घरातून मंगळवारी सहा तिरड्यांची अंत्ययात्रा निघाली. पार्डी (सुकळी) येथील हे दृश्य बघून सर्वांचेच काळीज हेलावले.

ठळक मुद्देसाक्षगंधाचा आनंद क्षणात हिरावला : पंचक्रोशीवर शोककळा, वराचे आई-वडील हिरावले, सर्वच स्तब्ध

गजानन अक्कलवार।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : ज्या घरातून आनंदाने नवरदेवाची वरात निघणार होती, त्याच घरातून मंगळवारी सहा तिरड्यांची अंत्ययात्रा निघाली. पार्डी (सुकळी) येथील हे दृश्य बघून सर्वांचेच काळीज हेलावले.कळंब-यवतमाळ मार्गावरील चापर्डानजीक सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरच्या अपघातात दहा जणांचे बळी गेले. मृतक पार्डी येथून यवतमाळ येथील वाघापूर येथे साक्षगंधासाठी गेले होते. परत येताना काळाने त्यांच्या वाहनावर घाला घातला. यात वरपित्यासह त्याची आई व इतर आप्तस्वकीय मृत्यू पावले. शासकीय सोपस्कारानंतर मंगळवारी सर्व मृतदेह पार्डी येथे आणण्यात आले. लग्न घरातूनच या सर्वांची अंत्ययात्रा निघाली. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. या अपघाताने गावासह पंचक्रोशीवरच शोककळा पसरली. साक्षगंधाचा आनंद क्षणातच हरविल्याने सर्वांनाच हूरहूर लागली.बुधवारी सचिन बाबाराव पिसे, रमेश पुंडलिक थूल, सुशीला रमेश थुल, तानबाजी पुंडलिक थूल, सुनील तानबाजी थूल, अपर्णा प्रशांत थूल, सक्षम प्रशांत थूल या सात जणांच्या मृतदेहावर पार्डीतील मोक्षधामात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी अंत्ययात्रा बौद्ध विहारात नेण्यात आली. तेथील प्रार्थना झाल्यानंतर अखेरच्या प्रवासाला प्रारंभ झाला. थूल परिवाराच्या दु:खाने सर्वांनाच गहिवरून आले होते. मोक्षधामात शोकसभा घेऊन मृतांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच सोमवारी रात्रीपासूनच नातेवाईकांनी पार्डीकडे धाव घेतली होती.अशीच स्थिती पिंपळगाव येथे होती. तेथे सोनाली शैलेष बोंदाडे, सानिका शैलेष बोंदाडे यांची सामूहिक अंत्ययात्रा काढून अंतिम संस्कार करण्यात आले. पार्डी व पिंपळगाव येथे उपस्थित नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. जानराव विष्णू झामरे यांच्या पार्थिवावर आसेगाव ता. चांदूररेल्वे येथे अंत्यसंस्कार झाले.दरम्यान आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी पार्डी येथे भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला. उईकेंच्या विनंतीवरून पालकमंत्री मदन येरावार यांनीही मुख्यमंत्र्यांशी बोलून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.आई आणि मुलगा एकाच तिरडीवरअपघातात अपर्णा प्रशांत थूल आणि त्यांचा सहा वर्षीय चिमुकला सक्षम ठार झाले. या दोघांचीही एकाच तिरडीवर अंत्ययात्रा काढण्यात आली. हे दृश्य बघून सर्वांचेच मन हेलावले. न कळत डोळ्यांमधून अश्रू वाहिले. दरम्यान आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी सोमवारी रात्रीपासून मंगळवारी अंत्ययात्रेपर्यंत सर्व व्यवस्था सांभाळली. विशेष म्हणजे या अपघातात ठार झालेला चालक सचिन याने २१ डिसेंबरलाच मित्राकडून क्रुझर वाहन विकत घेतले होते. अवघ्या चारच दिवसानंतर हा अपघात घडला.