शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

फौजदारासह सहा पोलीस निलंबित

By admin | Updated: May 12, 2016 02:36 IST

येथील कुख्यात गुंड प्रवीण दिवटे याला रुग्णालयीन उपचारादरम्यान स्पेशल ट्रिटमेंट देणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांना

आरोपी दिवटेला ‘स्पेशल ट्रिटमेंट’ भोवली : खासगी वाहन, हॉटेलात मुक्काम यवतमाळ : येथील कुख्यात गुंड प्रवीण दिवटे याला रुग्णालयीन उपचारादरम्यान स्पेशल ट्रिटमेंट देणाऱ्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. त्यात एका पोलीस उपनिरीक्षकाचाही समावेश आहे.निलंबितांमध्ये फौजदार के.के. सिंग, सहायक फौजदार वाघमारे, पोलीस कर्मचारी निर्मल राठोड, प्रफुल्ल फुलकर, पोलीस चालक विजय पारडकर आणि शरद शिवणकर यांचा समावेश आहे. बुधवारी या सहा पोलिसांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. येथील गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या प्रवीण दिवटे जिल्हा कारागृहात बंदीस्त आहे. न्यायाधीन बंदी असताना ५ मे २०१६ रोजी त्याला वैद्यकीय उपचाराकरिता जे.जे. रुग्णालय मुंबई येथे दाखल करण्यात आले. त्याकरिता भायखळा जिल्हा कारागृह येथे मार्गस्थ बंदी म्हणून त्याला वरिष्ठांनी परवानगी दिली होती. त्याला मुंबईला नेण्याकरिता शासकीय वाहन आणि स्ट्राँग गार्ड उपलब्ध करून देण्यात आले. परंतु प्रवासादरम्यान दिवटेला शासकीय वाहनाऐवजी खासगी वाहनात बसण्याची सवलत देण्यात आली. यवतमाळ ते मुंबई हा सलग प्रवास करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी पोलीस वाहनावर दोन चालक दिले गेले होते. मात्र त्यानंतरही दिवटेला खासगी हॉटेलात मुक्कामी ठेवले गेले. तो पुण्यात १६ ते १७ तास मुक्कामी होता. त्याबाबत नियंत्रण कक्षाला अथवा संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली गेली नाही. सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी दिवटेची हातमिळवणी करून त्याची सरबराई केल्याचे व सोईसुविधा पुरविल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने फौजदारासह सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले. पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करणे, कर्तव्यात निष्काळजीपणा, दिरंगाई, कसुरी केल्याचा ठपका या सहा पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी) राजकीय आश्रयाने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भडका उडण्याची चिन्हे यवतमाळ शहरात दोन प्रमुख गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. एका टोळीला सत्ताधारी पक्षाचा तर दुसऱ्या टोळीला विरोधी पक्षाचा वरदहस्त आहे. त्या बळावरच या टोळ्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सातत्याने करतात. पोलीस ठाण्यांचे डीबी पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि अधिकाऱ्यांची बोटचेपी भूमिका या टोळ्यांचे वर्चस्व वाढण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. प्रशासनच आक्रमक नसल्याने कनिष्ठ यंत्रणा या टोळ्यांशी जुळवून घेत आपले हितसंबंध जोपासत आहेत. राज्यात सत्ता परिवर्तन होताच यवतमाळात भाईगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भाईगिरीला राजकीय स्तरावरून खतपाणी घातले जात असल्याने पोलिसांचाही अनेकदा नाईलाज होताना पहायला मिळते. हा राजकीय वरदहस्त असाच कायम राहिल्यास आणि पोलिसांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे न बजावल्यास नजीकच्या भविष्यात यवतमाळात गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भडका उडण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.