शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

सहा पाझर तलाव अडकले भूसंपादनात

By admin | Updated: February 26, 2016 02:22 IST

तालुक्यातील सहा गावच्या पाझर तलावाचे काम रखडले आहे. तलावासाठी लागणारी जमीन त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे.

महागाव : तालुक्यातील सहा गावच्या पाझर तलावाचे काम रखडले आहे. तलावासाठी लागणारी जमीन त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. भूसंपादनाची प्रक्रिया संथगतीने सुरू असल्यामुळे सिंचनाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कातरवाडी, नांदगव्हाण, वरोडी, बिजोरा, धारमोहा आणि वनोली गावचे भूसंपादन प्रस्ताव रखडले आहेत. कातरवाडी पाझर तलावासाठी कार्यारंभ आदेश असून, संयुक्त मोजणीची प्रक्रिया पार पडलेली आहे. केवळ भूसंपादनाचे काम बाकी असल्यामुळे कातरवाडी येथील शेतकऱ्यांना मिळणारा लाभ थांबला आहे. भूसंपादनाची कारवाई तातडीने हाती घेतल्यास पाझर तलाव निर्माणानंतर शेतकऱ्यांना फायदा होईल. नांदगव्हाण पाझर तलावासाठी कार्यारंभ आदेश असून, संयुक्त मोजणीत शेतकऱ्यांना ६६ कायम नसल्यामुळे येथील मोजणी प्रक्रियाच थांबली आहे. नांदगव्हाण हा भाग खडकाळ असून, कायम पाणीटंचाईचे गाव म्हणून नांदगव्हाणची नोंद आहे. येथील पाणीटंचाईवर रामबाण उपाय म्हणून पाझर तलाव पर्याय असून, मुळात संयुक्त सर्वेमध्येच हा पाझर तलाव अडकला आहे. या तलावासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक आमदारांनी लक्ष घातल्यास ते सहज मार्गी लागण्यासारखे आहे. वरोडी पाझर तलावाचे कार्यारंभ आदेश आहेत. परंतु भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप हाती घेण्यात आली नाही. संयुक्त मोजणी पार पडली आहे. हा पाझर तलाव मार्गी लागल्यास पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. भूसंपादन झालेले नसल्यामुळे काम खोळंबले आहे. बिजोरा पाझर तलावाच्या भूसंपादनाचे अद्याप प्रस्तावच तयार करण्यात आलेले नाही. तीच गत धारमोहा पाझर तलावाची आहे. या दोन्ही पाझर तलावाचे भूसंपादन अहवालच तयार नाही. वनोली पाझर तलाव भूसंपादन प्रस्ताव तयार करण्यातच अडकला आहे. काहींचे भूसंपादनाचे प्रस्ताव तयार करणे सुरू आहे. तर काहींची मोजणी प्रक्रिया थांबली आहे. भूसंपादन प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पाझर तलाव निर्माणाचे कार्य ठरल्या वेळी होणे दिसत नाही. प्रस्तावित पाझर तलावाची सहाही गावे कमी अधिक प्रमाणात तीव्र पाणीटंचाईची आहेत. संबंधित गावच्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक आमदारांनी भूसंपादनाच्या कार्यवाहीला पुढे चालना जर दिली तर या पावसाळ्यापूर्वी पाझर तलाव पूर्ण होण्यास मदतच होणार आहे. सेनंद, बेलदरी आदी ठिकाणी असलेले पाझर तलाव बऱ्याच अंशी पाणी टंचाईवर मात करीत आहे. प्रस्तावित असलेल्या पाझर तलावामुळे पाणीटंचाई तर दूर होण्यास मदत होणार असून, जनावरांना पाण्याची सुविधा होणार आहे. (शहर प्रतिनिधी)