शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अपंग प्रमाणपत्रासाठी सहा महिने ‘वेटिंग’

By admin | Updated: January 17, 2015 00:13 IST

शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक अपंग प्रमाणपत्रासाठी एक-दोन नव्हे तब्बल सहा महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उंबरठे अपंग झिजवित आहे.

सुरेंद्र राऊत यवतमाळ शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक अपंग प्रमाणपत्रासाठी एक-दोन नव्हे तब्बल सहा महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उंबरठे अपंग झिजवित आहे. मात्र त्या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे दिली जाते. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुधवार आणि गुरूवार असे दोन दिवस वैद्यकीय मंडळ उपलब्ध असते. नियोजित दिवशी जिल्हाभरातून अपंग आॅनलाईन नोंदणीसाठी येतात. या आॅनलाईन नोंदीच्या प्रक्रियेत प्रथम अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणाऱ्यांवर अन्याय होत आहे. १४ जानेवारीला अन्सार दौलत खान रा. वसंतनगर पुसद हा पायाने अपंग असलेला युवक वैद्यकीय मंडळा पुढे हजर झाला. मात्र त्याला तब्बल सहा महिन्यानंतर जून महिन्यात तपासणीसाठी येण्याची तारीख देण्यात आली. अन्सारची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. अन्सार सारखीच अनेकांची परिस्थिती आहे. अपंगत्व तपासणीसाठी तासन्तास रांगेत असतात. जेव्हा डॉक्टरांपुढे अपंग हजर होतो तेव्हा त्याला पुढची तारीख दिली जाते. ही तारीख म्हणजे काही आठवड्याची नव्हे तर चक्क सहा-सहा महिन्याची असते. प्रमाणपत्र तपासणी झालेल्या दिवशीच करण्यात येईल, याची खातरजमा वैद्यकीय मंडळाच्या सदस्य, सचिव यांनी करावी असे स्पष्ट केले आहे. त्यानंतरही प्रमाणपत्रासाठी हेळसांड केली जात आहे. अन्सार दौलत खान याने याबाबत तक्रार अधिष्ठाताकडे केली. त्यानंतरही कोणतीच कारवाई झाली नाही.दोन भावंडांचे अपंगत्वच नाकारलेझरीजामणी तालुक्यातील पाटणबोरी येथील सै. शहारूख सै. रोशन (१४) आणि मोहसिन रोशन सैय्यद (१६) या दोन अपंग भावांनी प्रामणपत्रासाठी वैद्यकीय मंडळापुढे अर्ज केला. तपासणीसाठी त्यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून चकरा मारल्या. तपासणीनंतर ९ जानेवारी रोजी त्या दोघांचेही अपंगत्व नाकारले आहे. जन्मताच दोघेही भाऊ पायाने चालणे तर सोडाच बसूही शकत नाही. अशाही स्थितीत अपंगत्व कुठलेही कारण न देता नाकारण्याचा प्रताप वैद्यकीय मंडळाने केला आहे. याप्रमाणेच महागाव तालुक्यातील सवना येथील शेख साफी यालासुद्धा अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले नाही. हे प्रमाणपत्र का नाकारण्यात येत आहे. याचा कुठलाही खुलासा वैद्यकीय मंडळाने अद्यापपर्यंत केला नाही.