शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महिला सहकारी बॅंक अपहाराच्या तपासासाठी एसआयटी गठित

By सुरेंद्र राऊत | Updated: August 22, 2024 18:21 IST

आयपीएस रजनिकांत चिलुमुला प्रमुख : २४२ कोटींचा भ्रष्टाचार, २०६ आरोपींवर होणार कारवाई

यवतमाळ: येथील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेत ३२ हजार सभासद व ठेवीदारांचे पैसे बुडाले आहेत. या कष्टाच्या पैशावर संगनमत करून संचालक मंडळ, सीईओ, सीए, व्हॅल्युअर यासह १४२ कर्जदारांनी डल्ला मारला. २४२ कोटींची रक्कम गडप केली, असा आरोप विशेष लेखा परीक्षण अहवालातून ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आयपीएस तथा दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी रजनिकांत चिलुमुला यांच्या नेतृत्वात विशेष तपास समिती गठित करण्यात आली आहे.

सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे लुबाडणाऱ्यांमध्ये अनेक प्रतिष्ठीतांवर आरोप आहे. या गुन्ह्याचा तपास करताना मोठा राजकीय दबाव निर्माण होऊ शकतो, यापूर्वीही राजकीय दबावातूनच यातील आरोपींना पोलिसांकडून अभय देण्यात आले होते. गोरगरीब, सेवानिवृत्तांचा ठेवीस्वरूपात असलेला कष्टाचा पैसा कट रचून संगनमताने हडपला आहे. या सर्वांवर कठोर कारवाई करुन त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन गरीब ठेवीदार, सभासदांचे पैसे परत मिळावे, अशी अपेक्षा आहे. राजकीय पाठबळ असणाऱ्या बॅंकेतील ठगबाजांना पोलिस अटक करुन कारवाई करतील का असा प्रश्न आजही सामान्यांकडून व्यक्त होत आहे. 

कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे विशेष लेखा परीक्षणाचा एक हजारांवर पानाचा अहवाल आहे. त्यामध्ये १४२ कर्जदारांसह तत्कालीन संचालक, बॅंक अधिकारी यासह २०६ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहे. हा अहवाल सुस्पष्ट असून त्या आधारेच पोलिस तपास केला जाणार आहे. या प्रकरणात निष्पक्ष व प्रामाणिकपणे चौकशी होऊन कारवाई होते काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अपहाराचे फॉरेन्सीक ऑडिट होणारबॅंक अपहारावर विशेष लेखा परीक्षकांनी शिक्कामोर्तब करून २०६ जणांवर ठपका ठेवला आहे. आता या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यासाठी लेखा परीक्षण अहवालाचे पोलिसांकडून फॉरेन्सिक ऑडिट केेले जाणार आहे. या ऑडिटनंतर अटक व मालमत्ता जप्तीची कारवाई करता येणार आहे. 

"कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. अपहारात गुंतलेल्या कुणालाही अभय मिळणार नाही. आरोपी संख्या मोठी असून या प्रक्रियेला वेळ लागणार, नि:ष्पक्षपणे या गुन्ह्याचा तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय करणार नाही."- कुमार चिंता, जिल्हा पोलिस अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :fraudधोकेबाजीYavatmalयवतमाळ