शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नामांकनासाठी एकच गर्दी

By admin | Updated: February 2, 2017 00:27 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नामांकनाच्या बुधवारी अखेरच्या दिवशी येथील तहसील कार्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती.

निवडणूक : पुसदमध्ये गटांसाठी ७१, तर गणांसाठी १०९ अर्ज पुसद : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नामांकनाच्या बुधवारी अखेरच्या दिवशी येथील तहसील कार्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. विविध पक्षांनी अखेरच्या दिवशी एबी फॉर्म दिल्याने नामांकन दाखल करणाऱ्यांची धांदल उडताना दिसत होती. नामांकनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेच्या आठ गणांसाठी ७१ तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी १०९ अर्ज दाखल झाले होते. पुसद तालुक्यात जिल्हा परिषदेचे आठ गट व पंचायत समितीचे १६ गण आहे. बुधवारी नामांकनाची अखेरची तारीख होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यासह अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार नामांकनासाठी दाखल झाले होते. अनेक उमेदवार आपल्या समर्थकांसह तहसील कार्यालयात पोहोचले होते. त्यामुळे तहसील कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत १४ गावातील ४६ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले असून तालुक्यातील एक लाख ८३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून एक हजार कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नितीनकुमार हिंगोले काम पाहात असून तालुक्यात २८८ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी २६८ पोलीस नियुक्त करण्यात आले आहे. तालुक्यातील १४ गावातील ४६ मतदान केंद्रांना संवेदनशील म्हणून घोषित केले. त्यात शेंबाळपिंपरी, बेलोरा, इसापूर, हिवळणी, दगडधानोरा, जवळी, लाखी, जांबबाजार, चोंढी, गहुली, धनसळ, भोजला, बोरी खु, हर्षी आदी गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) मोहात नाईक विरुद्ध नाईक जिल्हा परिषदेचा मोहा गट सर्वसाधारण असून या गटात राष्ट्रवादीतर्फे आमदार मनोहरराव नाईकांचे सुपूत्र ययाती नाईक यांनी राष्ट्रवादीतर्फे नामांकन दाखल केले, तर त्यांच्याविरोधात भाजपातर्फे अ‍ॅड.निलय नाईक यांचे पुतणे अमेय अनिल नाईक यांनी नामांकन दाखल केले आहे. सर्वाधिक चुरशीची लढत या मतदारसंघात होणार असून जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.