शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एकाच बैलावर शेतमशागतीची साधली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:47 IST

शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे.

ठळक मुद्देऐपत नसल्याने शोधला मार्ग : दरवर्षी दहा एकर कसतो शेती, मुकिंदपूरच्या परसरामच्या कष्टाला नावीण्यतेची जोड

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे. एक बैल नसताना एका बैलाच्या भरोशावरच शेतीच्या मशागतीची कामे तो करत आहे. बैलासोबत स्वत: राबून त्याने शेतमाळ फुलविले आहे.आर्णी तालुक्यातील मुकींदपुर गाव पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल आडवळणावरील गाव. शेतीव्यतिरिक्त मासेमारी या गावातील मुख्य व्यवसाय. परसराम मेश्राम यांच्याकडे चार एकर शेती आहे. नदी लागून असल्याने दुसऱ्यांचेही शेत त्याने भाड्याने केले आहे. जमेल तेवढे सिंचन करून उत्पन्न वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा शेतकरी करत आहे. मात्र निसर्गाच्या संकटांनी नापिकीच वाट्याला आली आहे. या विपरीत स्थितीत मोठा आघात झाला. या बैलजोडीच्या जीवावर शेतीचा गाडा सुरू होता त्यातील तरणाबांड बैल अचानक मरण पावला. ऐन पेरणीच्या तोंडावर बी-बियाण्याची तजवीज करताना बैल खरेदी करणे शक्य झाले नाही. २००७ पासून आजतागायत परसरामला बैलाला जोड घेता आला नाही. या संकटावर मात करण्यासाठी त्याने स्वत:च खांद्यावर जू घेतले. काही दिवस हा प्रयोग केला. मात्र शारीरिक मर्यादेपुढे जमले नाही. त्यानंतर एका बैलावरच मशागतीचे व शेतीची इतर कामे करता येईल अशा स्वरूपाची अवजारे घरीच तयार केली. नागर, वखर, डवरा यासारखी मशागतीची साधने एका बैलावर चालविण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.२५ मे २००७ पासून एकाच बैलावर शेतीतील कामे सुरू असून वखरणे, डवरणे, पेरणे, बैलबंडी हाकलले ही कामे केली जात आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढत गेला. शेतीतील रुची वाढत गेली.एकाही शासकीय योजनेचा लाभ नाहीशासन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. उमद्या शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचतच नाही. कृषी विभागातील भ्रष्ट यंत्रणा वशीलेबाजांनाच योजनेचे घबाड देते. शासनाच्या योजनेसाठी शेतीसोडून तालुक्याला येरझारा घालणे न परवडणारे आहे. त्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक होत असल्याने कधीच शासकीय योजनेचा नाद केला नाही, असे परसराम पांडुरंग मेश्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.