शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वटफळीत रौप्य महोत्सवी धम्म परिषद

By admin | Updated: February 2, 2017 00:24 IST

भारतात ग्रामीण भागात एकाच व्यक्तीकडून होणारी रौप्य महोत्सवी धम्म परिषद २ व ३ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वटफळी येथे होत आहे.

बुद्धांच्या २७ मूर्र्तींचे अनावरण : विविध देशातील भन्तेजींची उपस्थिती किशोर वंजारी   नेर भारतात ग्रामीण भागात एकाच व्यक्तीकडून होणारी रौप्य महोत्सवी धम्म परिषद २ व ३ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील वटफळी येथे होत आहे. थायलंड, श्रीलंका, भूतान यासह विविध देशातील भदंतजी यांची उपस्थिती या परिषदेत राहणार आहे. देशभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे भदंत प्रा.सुमेधबोधी महाथेरो यांना या परिषदेत सन्मानित केले जाणार आहे. त्यांना एक कार भेट देऊन त्यातून मिरवणूक काढली जाणार आहे. या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू संघ बौद्धगयाचे संघनायक भदंत सदानंद महाथेरो राहणार आहे. उद्घाटन भदंत डॉ. पयालिंकारा (चीन) यांच्या हस्ते होणार आहे. भारतात सारनाथनंतर वटफळी येथे भगवान बुद्धांच्या २७ मूर्तीचे अनावरण या परिषदेनिमित्त होणार आहे. सम्राट अशोक, रामजी सुभेदार, भीमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई, जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळे लक्षवेधी ठरणार आहे. या ठिकाणी नव्यानेच तयार झालेले भिक्खू निवास, बौद्ध विहार, व्यायाम शाळा, ग्रंथालय परिषदेला येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरत आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन अशा एकूण ६० जणांना धम्मभूषण पुरस्कार दिले जाणार आहे. या परिषदेच्या आयोजनाची सुरुवात करणारे प्रा. सुमेधबोधी महाथेरो यांचा विशेष सत्कार यावेळी केला जाणार आहे. ध्वजारोहण, व्याख्यान, परिसंवाद आदी कार्यक्रम या परिषदेत होणार आहे. ऐतिहासिक ठेवा म्हणून ‘मृदगंध निळा मातीचा’ या स्मरणिकेचे प्रकाशन भदंत डॉ. पयालिंकारा यांच्या हस्ते २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. भगवान बुद्धांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवला जाणार आहे. परिषदेसाठी भास्कर चव्हाण, अनिल वाघमारे, सुनील बनसोड, जयकृष्ण बोरकर, धर्मपाल माने आदी पुढाकार घेत आहे.