शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग चिमुकल्यांच्या मूक संवेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी देशात आजवर अनेक आंदोलने झाली. मात्र शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने शुक्रवारी मूकबधीर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. चिमुकल्यांनी रॅलीत मूक संवेदना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देदारव्हात रॅली । फुले दाम्पत्याला भारतरत्न द्या, माळी महासंघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शहरातून मूक रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी दिव्यांग चिमुकल्यांनी स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवणाऱ्या फुले दाम्पत्याला भारतरत्न द्यावा, अशी मूक मागणी केली. यातून त्यांच्या संवेदना दिसून आल्या.मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यासाठी देशात आजवर अनेक आंदोलने झाली. मात्र शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे येथील अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने शुक्रवारी मूकबधीर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. चिमुकल्यांनी रॅलीत मूक संवेदना व्यक्त केल्या. प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हा संघटक गणेश राऊत होते.उदघाटक सुनयना अजात, प्रमुख वक्ते प्रा. प्रवीण बनसोड, प्रमुख पाहुणे वैशाली बनसोड, माळी महासंघाचे डॉ. वसंतराव उमाळे, महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. दत्तात्रय राहाणे, नगरसेवक रवी तरटे, अ‍ॅड. राजेश चौधरी यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. गणेश राऊत यांनी सामाजिक, राजकीय प्रगतीकरिता संघटनात्मक बांधणीशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन केले. देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले. निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले. विशेष म्हणजे सदर निवेदन बाबासाहेब नाईक मूकबधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिले. त्यातून चिमुकल्यांनी मूक संवेदना व्यक्त केल्या.स्वहस्ताक्षरातील पत्रे पाठविलीअक्षर तपस्वी दिवंगत दि.तु. होले गुरुजी यांच्या प्रेरणेतून मुलींच्या पहिल्या शाळेसाठी राबविलेल्या पत्र चळवळीतून विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहलेली पत्रेही पंतप्रधानांना पाठविण्यात आली. प्रास्ताविक गोपाल पुसदकर, संचालन अंबिका क्षीरसागर, तर आभार राजेंद्र घाटे यांनी मानले.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुले