शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: 'दहा जणांना विचारण्यापेक्षा थेट आंदोलकांशी बोला'; उद्धव ठाकरेंचे सरकारला आवाहन
3
जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख
4
"शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देऊ म्हणणारे गावी पळाले"; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
5
ITR भरण्याची डेडलाइन वाढली! पण 'या' चुका टाळा; नाहीतर ५,००० रुपयांचा बसेल भुर्दंड
6
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
7
अमित शाह यांचे शीर कापून टेबलावर ठेवायला हवे; TMC खासदार महुआ मोइत्रा यांचं वादग्रस्त विधान
8
मॅच संपल्यावर सर्व कॅमेरे बंद झालेले! मग भज्जी-श्रीसंत यांच्यातील वादाचा Unseen Video ललित मोदीकडे कसा?
9
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
10
शाळेतील शौचालयात विद्यार्थिनीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ!
11
"रोहित शर्माला संघाबाहेर ठेवण्यासाठीच ब्राँको टेस्ट आणलीये..."; माजी क्रिकेटरचा गंभीर आरोप
12
इस्रायलचा येमनवर सर्वात मोठा हल्ला, एकाच हल्ल्यात हुथी पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांच्या मृत्यूचा दावा 
13
अजय गोगावलेने गायलं 'देवा श्री गणेशा', रणवीर सिंहने फुल एनर्जीसह केला डान्स; व्हिडिओ व्हायरल
14
'तू काळी, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं
15
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
16
मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजोबाने दिला नातवाचा बळी; मृतदेहाचे तुकडे करुन नाल्यात फेकले...
17
जिओ, एअरटेल आणि VI चे एका वर्षासाठी सर्वात स्वस्त प्लॅन! कोण देतंय बंपर ऑफर?
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
19
"मी लग्न करेन तेव्हा..." कृष्णराज महाडिकांसोबतच्या 'त्या' फोटोवर पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू
20
भलताच ट्विस्ट! ७ दिवस बेपत्ता असलेली श्रद्धा सापडली, बॉयफ्रेंड भेटला नाही म्हणून मित्राशी लग्न

मूक वेदना बोलकी झाली

By admin | Updated: December 22, 2014 22:54 IST

सर्व प्राणीमात्रांसाठी जोडीदार असणे हा निसर्ग नियम आहे. जीवनाची यथार्थता सहचरांशिवाय अपूर्ण भासते. प्रत्येकाचे एक मर्यादित का असेना भावविश्व असते. रंगीबेरंगी स्वप्नांची सप्तपदी मनात

परिचय : अंध, अपंग, मूक, बधिरांचा उपवर-वधू मेळावा काशीनाथ लाहोरे - यवतमाळ सर्व प्राणीमात्रांसाठी जोडीदार असणे हा निसर्ग नियम आहे. जीवनाची यथार्थता सहचरांशिवाय अपूर्ण भासते. प्रत्येकाचे एक मर्यादित का असेना भावविश्व असते. रंगीबेरंगी स्वप्नांची सप्तपदी मनात रुंजी घालत असते. आपण कुणाचेतरी हक्काचे आहोत. आपले कुणीतरी मायेचे आहेत. आयुष्यभर एकमेकांना सांभाळून साथ करावी आणि आपला वारसदारही निर्माण करावा. आम्ही असे असलो तरी आमची पिढी अशी असणार नाही या दुर्दम्य आकांक्षेपोटी लग्न करण्याची मानवी इच्छा सहजसुलभ स्वीकारही पाहिजे. हे खरे असले तरी प्रत्येकाची सहजीवनाची मनिषा पूर्ण होतेच असे नाही. त्यातही शारीरिक व्यंग असेल तर ही समस्या अधिक तीव्र होते. त्यांची मूक वेदना ठसठसीतपणे अंगप्रत्यंगातून बोलू लागले. आपल्या भावभावना व्यक्त करताना त्यांना प्रचंड ओढाताण करावी लागते. कधी त्यांना नीट चालता येत नाही. पाहता येत नाही. बोलता येत नाही तर कधी बोललेले ऐकायला येत नाही. आपली शारीरिक असहायता मान्य करून प्रत्येकजण व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. कधी मदतीला कोणी असतो तर कधी आप्तनातलगांनी झिडकारलेले असते. शेवटी एकला चलो रे या जगराहाटीला अनुसरुन ही निसर्गानी घडविलेली खास निर्मिती जोडीदाराचा शोध घेण्यासाठी एकत्र आली होती. आपणही सामान्यांसारखे उत्तम जीवन जगण्याचा ध्यास घेऊन एकत्र आली होती. निमित्त होते सर्वधर्मीय अंध, अपंग, मूकबधीर अनाथ मुलामुलींचा वधू-वर परिचय मेळावा. स्थळ होते पाटबंधारे सांस्कृतिक भवन. गुरुदेव सार्वजनिक वाचनालय वडगाव रोड यवतमाळतर्फे हा आगळावेगळा उपक्रम यावर्षी राबविण्यात आला. १० वर्षांपासून विधवा-विधूर, परित्यक्ता, पौढ कुमारिका यांच्या परिचय मेळाव्यानंतर शारीरिक अपंगांसाठीही असा मेळावा घ्यावा असे वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद अजमिरे, सचिव नरेश उन्हाळे गुरुजी, सविता जुमळे, विजय साबापुरे, वंदना गुप्ता, वामनराव गोरे, प्रफुल्ल मेश्राम यांना प्रकर्षाने जाणवले. विचार कृतीत आणणारी ही माणसे त्या दृष्टीने कामाला लागली, आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद त्यांना लाभला. तब्बल २० मुले आणि १० मुलींनी आपल्या शारीरिक उणीवांसह आपला परिचय दिला. परिचयानंतर लग्न जळविण्यासाठी काही पालक आपसात चर्चा करताना दिसत होते, ही फलश्रृती होती.‘छन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देवखाई दैवाचे तडाखे, त्याचे माणूस हे नाव ‘देवकीनंदन गोपाला’ या चित्रपटातील गीताप्रमाणे अनेक सामाजिक प्रहार सहन करीत निसर्गाशी दोन हात करणारे हे शूर जीव आहेत. त्यांच्या इच्छा फलद्रूप व्हाव्यात हीच अपेक्षा.