शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांच्या बंगल्याला पोलिसांचा वेढा

By admin | Updated: July 12, 2014 23:54 IST

अपहरणातील फरार आरोपीच्या शोधात यवतमाळ पोलिसांना अक्षरश: पछाडले आहे. प्रत्येकच संशय आणि टीप तपासून पाहिली जात आहे. याच संशयातून पोलिसांनी काल चक्क येथील मावळत्या

फोन टॅपिंगचा संशय : फरार आरोपीच्या शोधात पोलीस पछाडलेयवतमाळ : अपहरणातील फरार आरोपीच्या शोधात यवतमाळ पोलिसांना अक्षरश: पछाडले आहे. प्रत्येकच संशय आणि टीप तपासून पाहिली जात आहे. याच संशयातून पोलिसांनी काल चक्क येथील मावळत्या नगराध्यक्षांच्या बंगल्यालाच घेराव टाकला होता. परंतु ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशा परिस्थितीला सामोरे जावे लागल्याने पोलीस तोंडघशी पडले. काही दिवसांपूर्वी पिंपळगावातील एका युवकाचे अपहरण झाले. त्याचा अद्यापही थांगपत्ता नाही. परंतु या अपहरणामागे यवतमाळातील एका राजकीय वरदहस्त असलेल्या आरोपीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याला अटक व्हावी म्हणून पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात आहे. या दबावाची सूत्रे थेट चंद्रपूरमधून फिरविली जात आहे. वरिष्ठांकडून दरदिवशी या तपासातील प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. ‘आरोपी सापडत कसा नाही’, अशा प्रश्नांची सरबत्ती होत असल्याने स्थानिक पोलीस अधिकारी अस्वस्थ आहेत. त्यामुळे या आरोपीचा शोध घेण्यासाठी मिळणारी एकही खबर सोडण्याचा धोका पोलीस पत्करताना दिसत नाही. अशातच पोलिसांना शुक्रवारी रात्री टीप मिळाली. चर्च रोडवरील एका बंगल्यात राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असून तो फरार संशयित आरोपी तेथे असल्याचे पोलिसांना सांगितले गेले. सुरुवातीला पोलिसांना त्या बंगल्याची ‘झाडी’ केली असता तेथे काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी उभी दिसली. त्या आरोपीकडेही अशीच गाडी असल्याने आपली टीप बरोबर असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यानंतर अतिरिक्त ताफा बोलावून जणू त्या परिसराला पोलिसांनी वेढा घातला. आरोपीच्या अटकेसाठी पुढे झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तर आपली अग्निशस्त्रेही बाहेर काढली. पोलीस ज्या बंगल्यात शिरले तो बंगला चक्क यवतमाळचे मावळते नगराध्यक्ष योगेश गढिया यांचा निघाला. प्रत्यक्षात तेथे तो आरोपीही नव्हता आणि ती काळ्या रंगाची गाडी भाजपच्याच एका कार्यकर्त्याची निघाली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच कोंडी झाली. तोंडघशी पडल्याने अखेर पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला. एवढा ताफा नगराध्यक्षही चक्रावून गेले होते. हा सर्व घटनाक्रम पाहता पोलिसांनी नगराध्यक्षांचा फोन तर टॅप केला नाही ना, अशी शंका राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे. आरोपीच्या नामसाधर्म्यातून पोलिसांचा हा गोंधळ उडाला. ज्या नावाच्या आरोपीचा पोलिसांना शोध आहे त्याच नावाचा व्यक्ती गढियांकडील बैठकीत हजर असल्याने हा गोंधळ उडाला. (कार्यालय प्रतिनिधी)