शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सोळाही तहसीलदारांना कारणे दाखवा

By admin | Updated: May 17, 2015 00:27 IST

खरडीचा मोबदला वितरणात हयगय केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सर्व सोळाही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस ...

साडेनऊ कोटींची मदत : खरडीचा मोबदला वितरणात हयगययवतमाळ : खरडीचा मोबदला वितरणात हयगय केल्याप्रकरणी जिल्ह्यातील सर्व सोळाही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. २४ तासात उत्तर सादर करण्याचे आदेश बजावण्यात आले आहे.सन २०१३ मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत चार हजार ५४५ हेक्टरवरची शेतजमिन खरडून गेली होती. खरडीचा प्रकोप इतका भयंकर होता, जमिनीतील दगडच याठिकाणी शिल्लक राहिले. यामुळे भविष्यात याठिकाणी शेती पिकणार नाही, अशी स्थिती आहे. यासाठी राज्य शासनाने त्यावेळी हेक्टर २५ हजारांची मदत देण्याची घोषणा केली होती. ही मदत तब्बल दोन वर्षानंतर वितरित करण्याचे आदेश धडकले. यासाठी नऊ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याकडे वळता झाला. महिन्यापूर्वीच तहसीलदारांच्या खात्यात निधी जमा झाला. मात्र यादी नसल्याचे कारण पुढे करत शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी जमा झाला नाही. याबाबत तहसीलदारांनी उपाययोजनाही केल्या नाही. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी याचा जाब विचारला होता. यावेळी तीन दिवसात विषय निकाली काढण्याच्या सूचना होत्या. शनिवारी तीन दिवस पूर्ण झाले. परंतु कुणाचाही अहवाल शासनाला मिळाला नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाने सोळाही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचे उत्तर २४ तासात मागविले आहे. या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नवीन जिल्हाधिकारी रुजू होणार आहे. अशा स्थितीत नव्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे तहसीलदारांना आपला निष्काळजीपणाचे कारण सादर करावे लागणार आहे. नवीन जिल्हाधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेतात यावर निधी वाटपाची प्रक्रिया अवलंबून राहणार आहे. हा निधी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यास त्यांना पेरणीसाठी याचा मोठा हातभार लागणार आहे. (शहर वार्ताहर)