शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लेटलतिफांना कारणे दाखवा

By admin | Updated: June 30, 2014 00:09 IST

नवीन सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळेत उशिरा पोहोचणाऱ्या शिक्षकांना पंचायत समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दिवशी सकाळी ७ वाजता उपस्थित राहून विविध उपक्रम

कळंब : नवीन सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळेत उशिरा पोहोचणाऱ्या शिक्षकांना पंचायत समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या दिवशी सकाळी ७ वाजता उपस्थित राहून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देण्यात आले होते. असे असतानाही शहरातील बहुतेक शाळांतील शिक्षकांनी लेटलतिफचा परिचय दिला.सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक आणि स्वाध्याय पुस्तिका वाटप करण्याचे आदेश होते. शालेय पूर्वतयारी आणि शाळा शुभारंभाच्या दिनी शैक्षणिक सत्र २०१४-१५ मध्ये राबवावयाच्या विशेष शैक्षणिक उपक्रमाची माहिती मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली होती. त्याअनुषंगाने शालेय परिसर स्वच्छता, नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत, गावातून प्रभातफेरी, वर्गखोल्या शुशोभित करणे, शालेय परिसरात आंब्याच्या पानाचे तोरण, पताका, रांगोळी टाकून स्वागत करणे, पोषण आहारात गोड पदार्थ आदी बाबी काटेकोरपणे पाळण्याचे आदेश होते. शहरातील अनेक शाळांतील शिक्षक ९ वाजतापर्यंत शाळेत पोहोचले नव्हते. शिक्षण विभागाच्या आदेशाला एकप्रकारे केराची टोपली दाखविण्याचे काम गुरुजींनी केल्याचे दिसून येते. अशा सर्व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषद बेसिक शाळेतील शिक्षक संजय राऊत, सचिन गायकवाड, वसंता वाघ हे उशिराने शाळेत पोहचले. संजय राऊत हे २५ जून रोजी शाळेत गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. शहराच्या मध्यभागी असलेली कन्या शाळा ८ वाजतापर्यंत उघडण्यातच आली नव्हती. या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता मसराम, शीला पवार, खडसे, उर्मीला, पटेल, सुष्मा बोरकर, गीता उमराणे, अमर थाटे, मंगेश डाफ हे नियोजित वेळेत गैरहजर आढळून आले. नेहरूनगर शाळेतील शिक्षक मीना चौधरी, विद्या ढोके, सत्यवती महल्ले व रजनी पांडव यांनीही शाळेच्या पहिल्या दिवशी लेटलतीफचा परिचय दिला. या सर्व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पंचायत समितीतून देण्यात आली.कामात हयगय सहन करणार नाही - बीईओअनेक शिक्षक प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतात. काही शिक्षक कामात हयगय करत असल्याच्या तक्रारी आहे. अशा शिक्षकांवर बारीक नजर असून त्यांची नियमबाह्य कृती यापुढे सहन केली जाणार नाही, असे गटशिक्षणाधिकारी गणेश गायनर यांनी सांगितले. शालेय वेळेत शिक्षकांच्या गप्पातालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या कन्या शाळेत २७ जून रोजी दुपारी ४ वाजता सर्व शिक्षक शाळेच्या बाहेर गोल खुर्च्या टाकून गप्पा मारत बसलेले होते. काही विद्यार्थी वर्गात तर काही बाहेर धिंगाणा घालत होते. याची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी गणेश गायनर यांनी या शिक्षकांची चांगलीच झाडाझडती घेतली. (तालुका प्रतिनिधी)