शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अल्प दिलासा

By admin | Updated: January 23, 2015 00:07 IST

तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने नऊ कोटी ७७ लाखांची मदत मंजूर केली आहे़ यातील पहिला हप्ता म्हणून सहा कोटी १० लाख रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मारेगाव : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने नऊ कोटी ७७ लाखांची मदत मंजूर केली आहे़ यातील पहिला हप्ता म्हणून सहा कोटी १० लाख रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उर्वरित तीन कोटी ६७ कोटी रूपये लवकरच प्राप्त होणार आहे़सन २०१४ च्या खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेने अपुरा पाऊस पडला. खंडवृष्टीने तालुक्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ दुबार, तिबार पेरण्या करूनही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुध्दा निघाला नाही़ तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने संपूर्ण तालुका दुष्काळसदृश्य घोषित केला़ या दुष्काळात होरपळलेल्या तालुक्यातील १०८ गावांतील १८ हजार ३६८ शेतकऱ्यांना शासनाकडून विलंबाने का होईना अल्पशी नऊ कोटी ७७ लाखांची मदत घोषित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला़ मंजूर मदतीपैकी पहिला हप्ता म्हणून प्राप्त झालेले सहा कोटी १० लाख रूपये तालुक्यातील ७६ गावांतील ११ हजार ७६४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तहसील प्रशासनामार्फत सुरू आहे़ उर्वरित तीन कोटी ७६ लाख रूपये लवकरच प्राप्त होणार आहे़ ती रक्कम ३२ गावांतील सहा हजार ६०४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे़ ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँक खाते उघडले नसतील, त्यांनी पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत बँक खाते उघडून खाते क्रमांक संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयात बँक पासबुकच्या झेरॉक्ससह द्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ़संतोष यावलीकर यांनी केले आहे़अत्यल्पभूधारक, अल्पभूधारकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर चार हजार ५०० रूपये, तर बहुभूधारकांना एक हेक्टरसाठी चार हजार ५०० रूपयांची मदत मिळणार आहे़ तालुक्यातील ज्या ७६ गावांतील ११ हजार ७६४ शेतकऱ्यांना प्रथम हप्त्याची सहा कोटी १० लाख देण्यात येणार आहे, त्यात नेत, गौराळा, वरूड, खैरगाव भेदी, वसंतनगर, वागदरा, दुर्गडा, कान्हाळगाव वाई, आवळगाव, सावंगी, धानोरा, लाखापूर, आकापूर, मच्छिंद्रा, खंडणी, मेंडणी, कुंभा खंड १ व २, श्रीरामपूर, इंदिराग्राम, सिंदी, महागाव, रामेधर, टाकळी, मुकटा, कानडा, पार्डी, झगडा, शिवणी, फेफरवाडा, हिवरा, गोरज, चोपण, चनोडा, बांबर्डा, आपटी, दांडगाव, चारगाव, बोरी बु़, कोथुर्ला, मांगली, कृष्णापूर, बडगाव, डोंगरगाव, किन्हाळा, कान्हाळगाव उजाड, तुकापूर, नवरगाव, हिवरी, म्हैसदोडका, रोहपट, पेंढरी, करणवाडी, खडकी, खापरी, हटवांजरी, घनपूर, गोधणी, केगाव, उमरघाट, किलोना, आसन, जगलोन, सराटी, कोलगाव, टाकरखेडा, डोर्ली, वडगाव उजाड, कोसारा, वनोजा, वेगाव, सगनापूर, रामपूर, अर्जुनी या गावांचा समावेश आहे़ तालुक््यातील उर्वरित गावांना दुसरा हप्ता प्राप्त होताच पैशाचे वितरण होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)