शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गल्लीबोळात शिकवणी वर्गांची ‘दुकानदारी’

By admin | Updated: May 18, 2017 00:56 IST

शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाचे पेव फुटले असून, गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवल करीत

आर्थिक पिळवणूक : गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवल लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : शहरासह तालुक्यातील गल्लीबोळात शिकवणी वर्गाचे पेव फुटले असून, गुणवंतांच्या टक्केवारीचे भांडवल करीत शिकवणी संचालक आपली तुंबडी भरत आहेत. लाखो रुपये कमावणाऱ्या या शिकवणी वर्गांकडे कुणाचेही लक्ष नसते. सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या जागेत विद्यार्थी शिकताना दिसतात. स्पर्धेच्या युगात टक्केवारीला महत्व आले आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाला पैकीच्या पैकी गुण हवे असतात. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. याच मानसिकतेचा फायदा शिकवणी वर्ग चालकांनी घेतला आहे. उमरखेड शहरातील गल्लीबोळात शिकवणीवर्ग सुरू झालेले आहेत. दहावी, बारावी आणि उच्च शिक्षणाच्या शिकवणीचे ठिक आहे परंतु शहरात नर्सरीपासूनच शिकवणी घेतली जात आहे. आपल्याकडे विद्यार्थी ओढण्यासाठी शिकवणी वर्ग चालकांमध्ये जाहिरातीचे युद्ध सुरू असते. लवकरच दहावीचा निकाल लागणार आहे. या निकालात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो काढून त्यांचे फ्लेक्स शहरात लावले जातात. त्यावर विद्यार्थ्यांच्या फोटोसह सरांचाही फोटो असतो. आमच्या शिकवणी वर्गात गुणवंत विद्यार्थी कसे घडतात याचे गुणगाण या जाहिरात फलकात दिसून येते. मात्र त्याच शिकवणीवर्गातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी मात्र शिकवणी संचालक झटकतात. आमचे विद्यार्थी असले तरी त्यांनी अभ्यास केला नसेल असे सांगतात. गुणवंतांचे श्रेय घ्यायचे आणि नापासांना दूर करायचे असा हा प्रकार आहे. शहरात असलेल्या शिकवणी वर्गात विद्यार्थी नियमित येतात तर दुसरीकडे सर्व सुविधा असलेल्या महाविद्यालयाला मात्र बुट्टी मारतात. पालकही शाळा बुडली तरी चालेले शिकवणी बुडवू नको असे सांगतात. शिकवणी वर्गात सुविधांचा अभाव ४शहरातील शिकवणी वर्गात सुविधांचा अभाव आहे. एखाद्या कोंदट खोलीत बाकडे टाकून शिकवणीवर्ग भरविले जातात. एका-एका बाकड्यावर चार-चार विद्यार्थी बसलेले असतात. शाळेत नसेल एवढी गर्दी या वर्गात असते. अनेकदा तर शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकाचा आवाजही जात नाही. आता तर शिकवणी चालकांनी पॅकेजेस सुरू केले आहेत. विविध विषयांचे पॅकेज घ्यायचे आणि विद्यार्थ्यांना गुणवंत करायचे, असा प्रकार सुरू असतो. विशेष म्हणजे लाखो रुपये कमावणाऱ्या या शिकवणी चालकांकडे आयकर विभागाचे लक्ष नसते.