शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीत दलालांचा सुळसुळाट

By admin | Updated: January 14, 2015 23:17 IST

कापूस खरेदीत दलालांचा प्रचंड सुळसुळाट झाल्याने शेतकऱ्यांची नाडवणूक होत आहे. पांढरे सोने असलेला कापूस शेतकऱ्यांसाठी काळा आणि कडू ठरत आहे.

शेतकऱ्यांची नाडवणूक : पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीवणी : कापूस खरेदीत दलालांचा प्रचंड सुळसुळाट झाल्याने शेतकऱ्यांची नाडवणूक होत आहे. पांढरे सोने असलेला कापूस शेतकऱ्यांसाठी काळा आणि कडू ठरत आहे.वणीत शासकीयसह खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या दोनही समितीत कापसाची आवक प्रचंड वाढली आहे. परिणामी कापूस खरेदीवर ताण पडत आहे. एकाच दिवशी जवळपास ६00 ते ७00 वाहने, बैलबंड्या कापूस घेऊन येत असल्याने खरेदीसाठी धावाधाव होत आहे. नेमकी हिच संधी साधून काही ‘दलाल’ शेतकऱ्यांची नाडवणूक करीत आहे. शेतकऱ्यांचा कापूस चक्क आपल्या नावे टाकून त्यांची बोळवण करीत आहे. पैशाची आवश्यकता असल्याने शेतकरी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे दलालांचे चांगलेच फावत आहे. सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू आहे. एका दिवशी जवळपास पाच हजार क्विंटलची कापूस खरेदी करण्याची व्यवस्था आहे. मात्र कापूस मोठ्या प्रमाणात येत असल्याने खरेदीवर विपरीत परिणाम होत आहे. त्याचा लाभ घेत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. सीसीआयतर्फे चार हजार ५0 रूपयांचा हमी दर प्रती क्विंटलला देण्यात येतो. मात्र बाजारातील गर्दी बघून अनेक शेतकरी खासगीत कापूस विकत आहे. यात भाव मात्र कमी मिळतो. खासगी कापूस विक्रीत प्रती क्विंटल जवळपास तीन हजार ९00 रूपयांपासून दर मिळत असल्याची माहिती आहे. अर्थात प्रती क्विंटल १00 ते १२५ रूपयांनी शेतकरी नाडविला जातो. मात्र पैशांची निकड असल्याने शेतकरी खासगी कापूस विक्रीकडे वळत आहेत. त्यातही काही दलाल चक्क शेतकऱ्याचा कापूस आपल्या नावे विकतात, अशी ओरड होत आहे. परिणामी काही दलालांच्या नावे आत्तापर्यंत शेकडो क्विंटल कापूस सीसीआयला विकण्यात आला असण्याची शक्यता बळावली आहे.कापूस खरेदीत शेतकऱ्यांपेक्षा दलालांचा जादा लाभ मिळत आहे. कापसाच्या पैशातून दलालीही कापली जात आहे. त्यातच काही दलाल शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी ‘साईड’ घेतात. जादा दराचे आमिष दाखवून त्यांच्या कापसाचे पैसे परस्पर उचलतात. पैसेही वापरतात. हा प्रकार खासगी बाजार समितीत सर्रास सुरू असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. (कार्यालय प्रतिनिधी)