शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

कापूस खरेदी विक्रीच्या चौकशीने धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर बाहेरच्या तालुक्यातील, बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारी आणि बड्या आसामींचा डाव यशस्वी झाला. कोट्यवधी रुपये यातून खिशात घातले गेले आहे. तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी तीन केंद्रावर नोंदणी केली होती. त्यातील सर्वेक्षणापूर्वी दोन हजार २५७ शेतकºयांनी ५९ हजार क्विंटल कापूस विकलेला होता.

ठळक मुद्देराळेगावात अडीच कोटीने हात मारला : व्यापारी व बड्या आसामींचा डाव यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यात नोंदणी करूनही ८०९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विकला नाही. सर्वेक्षणात यातील बहुतांश लोकांच्या घरी कापूस शिल्लक नव्हता, असे आढळून आले. यामुळे तब्बल २५ हजार क्विंटल कापूस सीसीआयला विकून जवळपास अडीच कोटी रुपयाने हात मारल्याचा संबंधितांचा डाव अयशस्वी झाला आहे. आता कापूस खरेदी-विक्रीची चौकशी सुरू झाल्याने अनेकांना धडकी भरली आहे.नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर बाहेरच्या तालुक्यातील, बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारी आणि बड्या आसामींचा डाव यशस्वी झाला. कोट्यवधी रुपये यातून खिशात घातले गेले आहे. तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी तीन केंद्रावर नोंदणी केली होती. त्यातील सर्वेक्षणापूर्वी दोन हजार २५७ शेतकºयांनी ५९ हजार क्विंटल कापूस विकलेला होता.सर्वेक्षणात उर्वरित दोन हजार १७० शेतकऱ्यांचे पैकी ४० टक्के शेतकºयांकडे कापूस नसल्याचे दिसून आले होते. हाच सर्वे आधी व संपूर्ण नोंदणीधारकाकडे झाला असता तर तेवढेच वा अर्धी नोंदणी बोगस सिद्ध झाली असती. सीसीआय, शासनास मोठा फटका बसला नसता. खºया शेतकºयांची कापूस खरेदीही लवकर आटोपून शासन यंत्रणेचा त्रास फार मोठ्या प्रमाणात वाचला असता.पेऱ्यापेक्षा जादा कापूस विक्रीप्रती हेक्टर उत्पादकता तपासून पेऱ्यापेक्षा जादा कापूस विक्री, पेरा नसतानाही पेरा दाखवून कापसाची शासकीय एजन्सीला विक्री, कापूस नसतानाही नोंदणी, नोंदणी नसतानाही शासकीय एजन्सीला कापूस विक्री आदी प्रकरणात सहकार विभागाने चौकशी सुरू केली आहे. कापूस नसतानाही नोंदणी करणाऱ्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेले असल्याने शासकीय यंत्रणा विविध माहितीच्या याद्या तयार करण्याच्या कामी लागली आहे.गैरव्यवहारात अनेकांचा सहभागमोठ्या प्रमाणात अनेक महाभाग शेतकऱ्यांच्या नावावर ठिकठिकाणी कापूस विकण्यास यशस्वी झाले. त्यातून त्यांनी व या कार्यात सहकार्य करणाऱ्यांनी आपआपल्या तुंबड्या भरून घेतल्या. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाचेच याबाबत लक्ष वेधले असून चौकशी करून मुद्देनिहाय माहिती मागविली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा याविरूद्ध मुंबईत आवाज उचलला असून चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :cottonकापूस