शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वीज वितरणच्या बिलाचा ग्राहकांना शॉक

By admin | Updated: November 17, 2014 23:03 IST

वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य ग्राहकांची सातत्याने थट्टा केली जात आहे. घरगुती वीज वापराचे बीलही हजारोंच्या घरात येत असल्याने अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

यवतमाळ : वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य ग्राहकांची सातत्याने थट्टा केली जात आहे. घरगुती वीज वापराचे बीलही हजारोंच्या घरात येत असल्याने अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. महिन्याच्या शेवटी विजेचे बील हाती पडेपर्यंत ग्राहक धास्तावलेल्या अवस्थेतच असतो. दर महिन्याला अव्वाच्यासव्वा वीज बील देऊन वितरण कंपनी ग्राहकांना एक प्रकारे शॉक देत आहे. घरातील वीज उपकरणे आणि त्यांचा वापर याच्याशी वीज कंपनीने दिलेल्या बिलाचा कोठेही ताळमेळ जुळताना दिसत नाही. साधारणत: महिन्याकाठी घरगुती मिटरचे बील किती आले याचा अंदाज त्या ग्राहकांना असतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चक्राऊन सोडणारे वीज देयक वितरण कंपनीकडून दिले जात आहे. अनेक नागरिक वितरण कंपनीच्या कार्यालयात अवास्तव आलेले वीज बील कमी करून देण्याचे अर्ज घेऊन जाताना दिसत आहे. या नागरिकांना कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून कधीही न समजणारे गणित सांगून आल्या पावली परत पाठविले जाते. महिन्या अखेरपर्यंत वीज बील भरले नाही तर पुरवठा कापण्याची धमकी दिली जाते. बऱ्याचदा एवढ्या महिन्याचे बील भरून टाका, पुढे त्रास होणार नाही असा आगाऊचा सल्ला दिला जातो. एकवेळची कटकट नको म्हणून आर्थिक भुर्दंड सोसण्याची तयारी दाखवत वीज बील भरले तरी ग्राहकाची सुटका होत नाही. पुन्हा दोन महिन्यांनी असाच अवास्तव आकडा असलेले बील त्याच्या माथी मारले जाते. याबाबत दाद मागण्याची सोय कुठेच नाही. वीज कंपनीकडून वीज बील देण्यासाठी नियमित मिटर रिडिंग नेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र कुणाच्याच घरी रिडिंग घेण्यासाठी कर्मचारी फिरकत नसल्याचे दिसते. अंदाजशीर महिन्याचा वीज वापर दाखवून विजेचे बील दिल्या जाते. कधीतरी अधेमधे एखाद्यावेळेस मिटर रिडिंग घेऊन त्या आधारावरच कित्येक महिने बील दिले जाते. हिवाळ््याचे दिवस असल्यामुळे सध्या तुलनेने विजेचा वापर कमी आहे. मात्र उन्हाळ््यातील गर्मीत न येणारे वीज बील आता हिवाळ््यातच येत आहे. वितरण कंपनीच्या या अडेलतट्टु धोरणामुळे अनेकांना आर्थिक संकटात टाकले आहे. सोयीसुविधा देण्यासाठी सदैव नकारघंटा वाजविणारी वीज वितरण कंपनी सरळसरळ अवास्तव बील पाठवून ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारत असल्याचे चित्र यवतमाळ शहरात पहावयास मिळत आहे. पेन्शनर्स असलेल्या ग्राहकांना दोन ते आठ हजार इतके वीज बील महिन्याकाठी दिल्या जात आहे. तीन खोल्याच्या घरात महिन्याभरात आठ हजारांची वीज जळते कशी याचा शोध वितरणच्या अभियंत्यांकडून घेतला जावा अशी मागणी होत आहे. मात्र कंत्राटदारांशी हातमिळवणी करून काही अधिकाऱ्यांनी ग्राहकांची लूट करण्याचा चंगच बांधला असल्याने अनेकांचा नाईलाज होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)