शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:42 IST

थेट ‘मातोश्री’पर्यंत गेलेला जिल्हा शिवसेनेतील वाद मिटविण्याचे आणि येथील प्रमुख दोन नेत्यांमध्ये असलेली गटबाजी मोडित काढण्याची जबाबदारी परिवहन मंत्री तथा शिवसेनेतील ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देदिवाकर रावतेंवर जबाबदारी : शुक्रवारी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : थेट ‘मातोश्री’पर्यंत गेलेला जिल्हा शिवसेनेतील वाद मिटविण्याचे आणि येथील प्रमुख दोन नेत्यांमध्ये असलेली गटबाजी मोडित काढण्याची जबाबदारी परिवहन मंत्री तथा शिवसेनेतील ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या गटबाजीवर डागडुजी करण्यासाठी ना. रावते शुक्रवारी यवतमाळात येत आहे.आर्णी रोडवरील एका मंगल कार्यालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाºयांची ८ सप्टेंबरला सकाळी १० वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. सर्व प्रमुख पदाधिकाºयांशी चर्चा करून त्यांची मते ना. रावते जाणून घेणार आहेत. ना. रावते यांच्याकडे पूर्वी पश्चिम विदर्भाची जबाबदारी होती. आता त्यांना संपूर्ण विदर्भाचे संपर्क नेते बनविण्यात आले आहे. या नियुक्तीनंतर शुक्रवारी रावते पहिल्यांदाच यवतमाळात येत आहे. जिल्हा शिवसेनेतील गटबाजी मोडून काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.जिल्ह्यात महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावनाताई गवळी हे प्रमुख दोन नेते आहेत. गेली कित्येक वर्ष एकजुटीने राजकारण, समाजकारण करणाºया या नेत्यांमध्ये वाशिम व यवतमाळच्या जिल्हा प्रमुख पदावरून वितुष्ट आले. ना. राठोड यांनी विश्वासात न घेता परस्परच जिल्हा प्रमुखांच्या नियुक्त्या केल्याचा खा. गवळी गटाचा आरोप आहे. भावनाताई गवळी यांनीसुद्धा या नियुक्त्यांवर स्थगनादेश मिळवून ‘मातोश्री’वर आपलेही वजन कायम असल्याचे या निमित्ताने दाखवून दिले. परंतु या स्थगनादेशाने जिल्हा शिवसेनेत व नेत्यांमध्ये उघडउघड दोन गट पडले आहे. गवळी गटानेही सर्व तालुका स्तरावर चाचपणी करून आपले संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला हा वाद मिटविण्यासाठी ना. रामदास कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या स्तरावर प्राथमिक चर्चा झाल्यानंतरही स्थगनादेश मात्र कायम आहे. शिवसेनेचे नेते व कार्यकर्त्यांमधील गैरसमज दूर करण्यात, गटबाजी संपविण्यात ना. रावते यांना कितपत यश येते याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे नेतृत्व पक्षात गटबाजी नसल्याचा दावा जाहीर कार्यक्रमांमधून करीत असले तरी प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे. गटबाजीचे उघड उघड प्रदर्शन पहायला मिळत आहे.