शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विमा तफावतीने शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:28 IST

विमा कंपनीने पीकविम्याची मदत जाहीर करताना प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावले. यामुळे समान नुकसानग्रस्त शेतकºयांना समान मदत मिळाली नाही. हा दुजाभाव दूर करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिली.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर मोर्चा : खासदारांचे नेतृत्व, जिल्हाभरातील शेतकऱ्यांशी दुजाभाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विमा कंपनीने पीकविम्याची मदत जाहीर करताना प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावले. यामुळे समान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना समान मदत मिळाली नाही. हा दुजाभाव दूर करावा या मागणीसाठी सोमवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिली.जिल्ह्यात बोंडअळीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना समान मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने प्रत्येक सर्कलला वेगळे निकष लावून मदत वाटपात तफावत निर्माण केली. या गंभीर बाबीकडे राज्य शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करण्यात आले. पंचनाम्यात अनेक त्रुटी आढळल्या. यामुळे अनेक गावे मदतीमधून वगळली गेली. त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली.पीकविमा जाहीर करण्यापूर्वी तलाठी पंचनामे करतात. यामध्ये शेताचे उत्पादन काढण्यात येते. ही प्रक्रिया करताना शेतकऱ्यांनाच अंधारात ठेवले जाते. गावातील प्रतिष्ठिताना यावेळी बोलावले जात नाही. ही प्रक्रिया कागदोपत्रीच पार पडते. यामुळे पीकविम्याच्या मदतीत तफावत होते. या प्रकरणात कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. कर्जवितरण प्रणाली मंदगतीने काम करीत आहे. बोंडअळीची मदत अनेकांना मिळाली नाही. तुरीचे चुकारे बाकी आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष घालावे, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी केली.निवेदन देतेवेळी खासदार भावना गवळी, विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण पांडे, उप जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, किशोर इंगळे, संजय रंगे, उमाकांत पापीनवार, विकास जामकर, दिगांबर मस्के, विनोद काकडे, वसंत जाधव, विक्रम बऱ्हाणपुरे उपस्थित होते.गरज नसताना मागतात सर्च रिपोर्टकर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँका ‘सर्च रिपोर्ट’ मागत आहे. या सर्च रूपोर्टची गरज नसताना पुसदच्या युनियन बँकेने शेतकऱ्यांना मागणी केली. यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केला.पीक कापणीचा विचार व्हावा-भावना गवळीपीक विमा जाहीर करताना पीक कापणी प्रयोग ग्राह्य धरला जातो. मात्र हा प्रयोग कुठल्या सर्वेनंबरमध्ये होणार आहे, कुठल्या गावातील शेतकऱ्याची निवड करण्यात आली, याची कुठलीही माहिती गावकºयांना दिली जात नाही. हा प्रयोग केवळ कागदोपत्रीच होतो, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे पीक कापणी प्रयोग विमा कंपनीने जाहीर करावा, अशी मागणी खासदार भावना गवळी यांनी पत्रपरिषदेत केली.