शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिक ‘मजीप्रा’वर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:17 IST

यवतमाळ शहरात गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा ठप्प असल्याने ऐन दिवाळीतच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी सकाळीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देऊन अभियंत्यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देखासदारांचे नेतृत्त्व : १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, चार महिन्यांच्या बिलमाफीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरात गेल्या १५ दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा ठप्प असल्याने ऐन दिवाळीतच नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी सकाळीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देऊन अभियंत्यांना धारेवर धरले.यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. त्यासाठी संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. रस्त्यांची ही कामे करताना ठिकठिकाणी पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडले आहे. अलिकडेच मार्इंदे चौक परिसरातील मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले होते. हिवाळ्यात रस्त्यावर जणू गंगा वाहू लागली होती. मुख्य वाहिनी फुटल्याने दोन आठवड्यांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन दिवाळीतच पाणी नसल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ होत आहे. पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे.एकीकडे प्रशासन भूगर्भातील पाणीसाठा वाढल्याचे तसेच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. मुबलक पाणी असेल तर दरदिवशी नळ का सोडले जात नाही, असा सवाल यवतमाळकर नागरिक विचारत आहे. दरम्यान सोमवारी सकाळीच खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जीवन प्राधिकरणावर धडक देऊन अभियंत्यांना जाब विचारला. चार महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याने या काळातील पाणीपुरवठ्याचे संपूर्ण देयक माफ करावे, अशी मागणी भावना गवळी यांनी केली. शहराला तातडीने व नियमित पाणीपुरवठा सुरू करा, शुद्ध पाणी द्या अशी मागणी करण्यात आली. त्यावर प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी तिसरा पंप सुरू करून आजपासूनच रोटेशननुसार शहराला पाणीपुरवठा सुरू करीत असल्याचे सांगितले. सार्वजनिक नळांमधून पिवळे पाणी येत असले तरी ते आरोग्यास धोकादायक नाही, तातडीने ते शुद्ध करणे शक्य नसल्याचे बेले यांनी स्पष्ट केले. भावना गवळीच्या आंदोलनानंतर दर्डानगर टाकीवरुन त्या भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, उप जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, दिगांबर मस्के, तालुका प्रमुख संजय रंगे, विनोद काकडे, वसंत जाधव, नीलेश मैत्रे, यवतमाळ पंचायत समिती उपसभापती गजानन पाटील, शहर प्रमुख पिंटू बांगर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठ्याअभावी त्रस्त असलेल्या महिलांचीही संख्या यावेळी अधिक होती.