शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

जिल्हाभरात शिवरायांचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

यवतमाळ येथे शिवतीर्थावर सकाळी ८ वाजतापासून शिवरायांच्या पुतळ्यापुढे अभिवादन करण्यासाठी मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांची रीघ लागली होती. असाच उत्साह पुसदच्या शिवाजी चौकात पाहायला मिळाला. दिग्रस, पांढरकवडा, महागाव, नेर, घाटंजी, आर्णी, बाभूळगाव, वणी अशा सर्वच तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा, व्याख्यान व अन्य कार्यक्रमांचे आयोजन धूमधडाक्यात पार पडले. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सोळाही तालुक्यांमध्ये शिवरायांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले. यवतमाळ येथे शिवतीर्थावर सकाळी ८ वाजतापासून शिवरायांच्या पुतळ्यापुढे अभिवादन करण्यासाठी मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांची रीघ लागली होती. असाच उत्साह पुसदच्या शिवाजी चौकात पाहायला मिळाला. दिग्रस, पांढरकवडा, महागाव, नेर, घाटंजी, आर्णी, बाभूळगाव, वणी अशा सर्वच तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा, व्याख्यान व अन्य कार्यक्रमांचे आयोजन धूमधडाक्यात पार पडले. अभिवादन कार्यक्रमानंतर काही ठिकाणी दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी कोरोनाचे नियम पाळत जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्वत्र भगव्या पताकांनी लक्ष वेधून घेतले. फेटे परिधान केलेले युवक, लुगडे परिधान केलेल्या युवतींनी दुचाकी रॅलीत सहभाग घेतला. शेंबाळपिंपरीसारख्या गावात पायदळवारी काढण्यात आली. यवतमाळच्या शिवतीर्थावर दिवसभर रक्तदान शिबिर आणि कोविड लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला. यात युवकांनी उत्साहाने रक्तदान केले. शिवतीर्थ परिसरात शिवरायांची प्रतिमा, मूर्ती व विविध साहित्याच्या दुकानांनी लक्ष वेधले. सायंकाळच्या सुमारास शिवभक्तांनी भगव्या पताका उडवून जल्लोष साजरा केला. जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी वातावरणात वेगळाच उत्साह संचारला होता. 

शिवजयंती घराघरांत, शिवराय मनामनांत  - सार्वजनिक शिवजयंतीसोबतच यंदा ‘शिवजयंती घराघरांत’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये हजारो नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला. आपल्या घरी शिवरायांच्या जीवनातील एखाद्या प्रसंगाचा देखावा साकारून नागरिक या उपक्रमात सहभागी झाले. यवतमाळसह पुसद, वणी, दिग्रस, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी आदी     तालुक्यांमध्येही हा उपक्रम राबविला गेला. त्यासोबतच वाॅर्ड तेथे शिवजयंती हा उपक्रमही राबविला गेला.

 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंती