शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

शिव, ग्रामीण रस्ते नामशेष

By admin | Updated: September 18, 2014 23:43 IST

ग्रामीण भागातील गावशिव आणि ग्रामीण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत

शिंदोला : ग्रामीण भागातील गावशिव आणि ग्रामीण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पांदण रस्ते व गावाशिव नामशेष होत आहेत़ दुसरीकडे धुऱ्यावरून मात्र शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत. तालुक्यातील महसूल व भूमिअभिलेख कार्यालयाने तालुक्याच्या गाव रस्त्यांची व गावाशिवांना अतिक्रमणापासून रोखण्याची काळजी घेणे गरजेचे आहे़ मात्र शासकीय कर्मचारी कामात कुचराई करीत असल्याने अतिक्रमणाचा सपाटा वाढत आहे़ परिणामी जुने ग्रामीण रस्ते, पांदण रस्ते सध्या बेपत्ता झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे़ गावाशिवेचा रस्ता, पांदण रस्त्यावरील अतिक्रमणामुळे शेतीपयोगी माल, साहित्याची वाहतूक करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे़ परिणामी पांदण रस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांची भांडणे होऊन प्रकरणे पोली, न्यायालयात पोहोचत आहेत. मात्र पांदण रस्त्याच्या, गाव रस्त्याचा प्रश्न सुटण्याऐवजी जटील होत आहे़ सोबतच वणी तालुक्यात वन विभाग व महसूल विभागाची हजारो एकर जमीन आहे़ त्यावर गिट्टी खाणीच्या उत्खननासाठी परवानगी देण्यात आली. तथापि लिजधारक शासनाकडून कमी जागेची लिज घेऊन जादा जागेवर उत्खनन करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचे ‘आर्थिक’ हित साध्य होत असल्यामुळे त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा संशय आहे.वणी तालुक्यातील कुर्ली, मेंढोली, मोहदा, शिरपूर, सुकनेगाव, पिंपरी आदी गावांच्या परिसरातील जंगलाची तोड करून त्या ठिकाणी शेती केली जात आहे़ परंतु वनविभाग बघ्याची भूमिका घेत या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे़ शासकीय जमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणेने वेळीच या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. त्याला कितपत प्रतिसाद मिळतो, हे मात्र अनुत्तरीत आहे. (वार्ताहर)