एव्हरेस्टवीराचा सत्कार : ज्वाला-क्रांती किल्लोत्सव मंडळ प्रथमदिग्रस : येथील शिवतेज संघटनेच्यावतीने आयोजित शिवतेज किल्लोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी येथे पार पडले. या स्पर्धेत ज्वाला-क्रांती किल्लोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. यावेळी औरंगाबाद येथील एव्हरेस्टवीर रफीक शेख यांना शिवभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संतोष आगरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड़ मकरंद कटारे, नवनिर्वाचित नगराध्यक्षा सदफजहाँ, पोलीस उपनिरीक्षक गजानन खरडे, शिवतेजचे संस्थापक संतोष झाडे उपस्थित होते. दिग्रस येथील शिवतेज संघटना दिवाळीच्या सुटीत किल्लोत्सवाचे आयोजन करत असते. या स्पर्धेत शहरातील विविध मंडळे सहभागी होतात. यंदा आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्वाला-क्रांती मंडळ, व्दितीय क्रमांक रामनगर येथील बंजारा किल्लोत्सव मंडळ, तृतीय क्रमांक कळसा येथील लक्ष्यवेध मंडळ, चौथा क्रमांक एकता मंडळाने कमाविला. त्यांना रोख रकमेसह स्मृतीचिन्ह देण्यात आले. औरंगाबाद पोलीस दलातील जवान एव्हरेस्टवीर ठरलेले रफीक शेख आणि दिग्रस येथील डॉ. प्रभाकर आसेकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सदफजहाँ यांचा सत्कार करण्यता आला. संचालन अमीत चव्हाण यांनी तर आभार श्याम लोखंडे यांनी मानले. (प्रतिनिधी)
शिवतेज किल्लोत्सवाचे बक्षीस वितरण
By admin | Updated: January 17, 2017 01:29 IST