शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शिंगाडा तलावाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:19 IST

शहराचे भूषण असलेल्या येथील इंग्रजकालीन शिंगाडा तलाव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेरचा घटका मोजत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनातर्फे तलावाचे खोलीकरण न करण्यात आल्याने आता केवळ पाण्याचे डबकेच साचले आहे.

ठळक मुद्देसौंदर्यीकरण रखडले : तलावात वाढली झुडपे, खुल्या जागेवर केले अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहराचे भूषण असलेल्या येथील इंग्रजकालीन शिंगाडा तलाव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेरचा घटका मोजत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनातर्फे तलावाचे खोलीकरण न करण्यात आल्याने आता केवळ पाण्याचे डबकेच साचले आहे. लोकसहभागातून या तलावाच्या खोलीकरणाच्या कामाला सुरूवातही केली होती. मात्र ते काम अर्धवट सोडल्याने हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.ब्रिटीशकाळात वणी जिल्हा असल्यामुळे या परिसरात विहिरीचे स्त्रोत जिवंत ठेवण्यासाठी तलवाची निर्मिती करण्यात आली होती. इंग्रजांनी २५ एकर परिसरात हा तलाव बनवून तीन मोठे बुरूज यामध्ये ठेवण्यात आले होते. जत्रा मैदानातील बैल बाजारात येणारी जनावरे याच तलावाच्या भरवशावर आपली तहान भागवत होती. तसेच विदर्भाचा शिंगाडा विदर्भात प्रसिद्ध होता. या शिंगाड्याच्या भरवशावर भोई समाजबांधव आपली उपजिवीका भागवत होते. तसेच या तलावाच्या भरवशावर मासेमारीसुद्धा करण्यात येत होती. मात्र आता या तलावाचेच अस्तित्व धोक्यात आल्याने हा व्यवसायही धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरातील संपूर्ण सांडपाणी या तलावात शिरत असल्याने पाण्यालाही दुर्गंधी सुटली आहे. या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी वणीच्या मच्छिमार सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली होती. मात्र अद्यापही या निवेदनावर प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.चार कोटी ४९ लाखांचा निधी गेला तरी कुठे?वणी शहरातील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी व पुनरुज्जीवनासाठी शासनातर्फे चार कोटी ४९ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामाचे भूमिपूजन करून तसा फलकही तलावाच्या परिसरात लावण्यात आला होता. मात्र तेव्हापासून या तलावाचे सौंदर्यीकरण न झाल्यामुळे हा निधी गेला तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.