शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
3
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
4
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
5
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
6
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
7
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
8
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
9
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
10
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
11
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
12
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
13
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
14
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
15
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
16
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
17
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
18
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
19
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
20
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

सहा नगरपंचायतींचे आज ठरणार शिलेदार

By admin | Updated: November 27, 2015 02:44 IST

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाची निवड शुक्रवारी होऊ घातली असून यासाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जोरदार मोर्चेबांधणी : अपक्षांचे भाव वधारलेयवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाची निवड शुक्रवारी होऊ घातली असून यासाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काठावर संख्याबळ असलेल्या नगरपंचायतीत अपक्षांची मनधरणी सुरू आहे. राळेगावच्या नगराध्यक्षाची निवड अविरोध झाली असून भाजपाचे बबन भोंगारे पहिले नगराध्यक्ष ठरले आहेत. जिल्ह्यातील महागाव, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव आणि झरीजामणी या नगरपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. बहुतांश नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत नसल्याने नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याची जिल्ह्याला उत्सुकता आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाल्याने सरपंचाऐवजी आता या सहा ठिकाणी नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षाच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बाभूळगावात काँग्रेसचा अर्ज मागेबाभूळगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीतून काँग्रेसच्या शुभांगी दिलीप गव्हाळ यांनी नामांकन मागे घेतले आहे. त्यामुळे आता दोनजण रिंगणात उतरले आहे. अपक्ष कोमल अंकित खंते आणि नगरविकास आघाडीच्या सोनाली अभय तातेड यांचे अर्ज कायम आहे. राजकीय घडामोडींवर निवड अवलंबून आहे. शुभांगी गव्हाळ यांनी अचानक उमेदवारी मागे घेतल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. कळंबमध्ये दोन जण रिंगणातकळंब नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे दिगांबर मस्के आणि काँग्रेसचे फारूक सिद्धीकी यांच्यात लढत होत आहे. अपक्ष नगरसेवक शैलजा उमरतकर यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उमेदवारी दाखल केली होती. परंतु ऐनवेळेवर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिवसेना-भाजपा युती व काँग्रेस यांच्यात लढत होणार आहे. शिवसेनेचे पाच तर भाजपाचे चार असे नऊ नगरसेवक आहे. त्यामुळे युतीचाच नगराध्यक्ष होईल, हे जवळजवळ निश्चित आहे. काँग्रेसजवळ केवळ चार नगरसेवक आहे. अपक्ष शैलजा उमतरकर कुणाला मतदान करणार, हेही महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्ष एकत्र आले तरी बहुमताचा आकडा गाठता येत नाही. त्यामुळे कागदावर तरी दिगांबर मस्के नगराध्यक्ष होईल, अशी स्थिती आहे. काँग्रेसकडून भाजपाचा एक नगरसेवक गैरहजर ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. उपाध्यक्षपदासाठी मनोज काळे यांचे नाव निश्चित झाले आहे.झरीजामणीत चुरसझरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली असून भाजपाच्या मंदा सिडाम आणि अपक्ष निर्मला कोडापे यांच्यात लढत होत आहे. दोन्ही दावेदारांकडे संख्याबळ कमी असल्याने अपेक्षित बहुमत जुळविण्यासाठी धावपळ सुरू आहे. यात भाजपाकडे आठ संख्याबळ आधीच जुळले आहे. त्यांना केवळ एका सदस्याची गरज आहे. त्यामुळे एका सदस्याचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू असून त्यात त्यांना यश आल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, स्वीकृत नगरसेवक यांची निवड होणार आहे. अध्यक्षपदाची निवड शुक्रवारी असल्याने ऐन वेळेवर आघाड्या आणि गटनेत्यांची निवड प्रक्रिया सुरू होती, तर काही ठिकाणी संख्याबळ कायम ठेवण्यासाठी अपक्ष व पक्षातील नगरसेवकांना पर्यटनासाठी बाहेर पाठविण्यात आले आहे. या खेळीत यशस्वी ठरलेल्या नगरसेवकालाच पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळणार आहे. (लोकमत चमू)राळेगावचे पहिले नगराध्यक्ष बबन भोंगारे बिनविरोधराळेगाव नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा बहुमान तोही अविरोध भाजपाचे बबन भोंगारे यांना मिळाला आहे. वनीता दुर्गे यांनी नामांकन मागे घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी एकमेव भोंगारे यांचे नामांकन आहे. त्यामुळे त्यांची आज केवळ त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे. तसेच अपक्ष नगरसेवक किशोर जुनूनकर यांनीही उमेदवारी मागे घेतली. शहराच्या विकासासाठी आपण भाजपाला सहकार्य करीत असल्याचे सांगितले. नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड.प्रफुल्ल चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. येथील स्थानिक विश्रामगृहात आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांनी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची सभा घेऊन बबन भोंगारे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी घोषित केले. मारेगावमध्ये कुतूहलमारेगाव नगरपंचायतीमध्ये काठावरच्या बहुमतामुळे शिवसेना, भाजप आणि अपक्ष यांना बरीच आकडेमोड करावी लागत आहे. शिवसेनेकडून इंदू दिनेश किनेकर रिंगणात आहे, तर राष्ट्रवादीकडून जिजाबाई वसारकर, नलिनी ताकसांडे यांनी नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले आहे. येथील नगरपंचायतीचा निकाल लागल्यानंतर सत्तेत कोण येणार, याबाबत कुतूहल निर्माण झाले होते. काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.