शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शिवणीच्या कालव्यातील सांगाडा गुंठाचाच

By admin | Updated: September 24, 2014 23:42 IST

गुंठा राऊतला चाकूने वार आणि डोक्यात दगड घालून घटनास्थळीच ठार केले आणि मृतदेह घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील एका कालव्यात जाळल्याची खळबळजनक कबुली अटकेतील पाच जणांनी दिली.

यवतमाळ : गुंठा राऊतला चाकूने वार आणि डोक्यात दगड घालून घटनास्थळीच ठार केले आणि मृतदेह घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील एका कालव्यात जाळल्याची खळबळजनक कबुली अटकेतील पाच जणांनी दिली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी येथील पिंपळगाव परिसरात गौरव उर्फ गुंठा राऊत याच्या अपहरण प्रकरणाचे अखेर रहस्य उलगडले. आनंद उर्फ गोलू पारधी (२३), सतीश चंद्रशेखर चौधरी (२१), मनिष रामदुल्हारे यादव (२१) तिघेही रा. पिंपळगाव, आरीफ शहा शफीक शहा (२६) रा. बोरगाव, अक्षय अनिल गुंजाळ (२३) रा. गिरीजानगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. २१ जुनच्या रात्री ११ वाजता येथील पिंपळगाव बायपास मार्गावर गौरव उर्फ गुंठा राउत (२२) रा. मोठे वडगाव याच्या मागावर असलेल्या टोळक्याने त्याचे अपहरण केले. तेव्हापासून गुंठा बेपत्ता होता. तर येथील गुन्हेगारी वर्तुळातील अनेक संशयित पसार होते. तीन महिने उलटूनही गुंठाचा थांगपत्ता लागत नसल्याने पोलीस संशयितांच्या मागावर होते. त्यातच येथील उपविभागिय पोलीस अधिकारी राहूल मदने यांना गोलू पारधी याचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांनी क्रमांक सायबर क्राईम सेलमार्फत ट्रेस केला. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी गोलूचे लोकेशन मध्यप्रदेशातील भिंड आणि त्यानंतर बालाघाट येथे आढळून आले. त्यांनी लगेच पथक रवाना करून बालाघाट येथे शोध घेतला. तेव्हा गोलू हा साथीदार मनिषसह मामा तुळशीराम बगमारे रा. बालाघाट यांच्याकडे आश्रयाला असल्याची माहिती मिळाली. पथकाने दोघांनाही अटक केली. माहितीच्या आधारे आरीफ शहा याला आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे, अक्षयला एलआयसी चौकातून तर सतीशला त्याच्या घरून अटक केली. त्यांनी १३ जणांनी गुंठावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची कबूली दिली. तसेच मृतदेह स्कॉर्पीओ वाहन (क्र. एमएच १६ - जी. १६५६) ने घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील कालव्यात डिझेल टाकून जाळल्याचे उघड केले. त्यानंतर प्रविण दिवटे, विक्की कनाके दोघेही रा. यवतमाळ आणि हाजी सरवर उर्फ हाजी भाई रा. घुग्गुस असे आठजण पसार झालो. मात्र बजरंग सोळंकी, आकाश धनाडे, सागर भूते, अशोक उर्फ भुऱ्या येसणे आणि चालक निलेश उर्फ टेलर कोयरे सर्व रा. यवतमाळ हे घराकडे परतल्याचेही त्यांनी सांगितले. कारवाई फौजदार संतोष माने, ईक्बाल शेख, संतोष मडावी, प्रमोद मडावी, तुषार नेवारे, विजय जाधव यांनी केली. (स्थानिक प्रतिनिधी)