शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नेर बसस्थानकाला आले गिट्टी खदानीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:54 IST

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मोठे अशी ख्याती असलेल्या नेर येथील बसस्थानकाला आज गिट्टी खदानीचे स्वरूप आले आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण प्रांगणातील उखडलेल्या गिट्टीमुळे एसटी बसचे मोठे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना धूळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देएसटी बसेसचे नुकसान : धुळीमुळे प्रवाशांना त्रास, देखभालीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मोठे अशी ख्याती असलेल्या नेर येथील बसस्थानकाला आज गिट्टी खदानीचे स्वरूप आले आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण प्रांगणातील उखडलेल्या गिट्टीमुळे एसटी बसचे मोठे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे प्रवाशांना धूळीचा त्रास सहन करावा लागत आहे.सन १९१४ मध्ये याठिकाणी बसस्थानकाची नवीन वास्तू उभी राहिली. पुढे या इमारतीच्या आणि आवाराच्या देखभालीकडे संबंधितांचे पूर्णपणे दुर्लक्ष राहिले. आज या बसस्थानकाच्या आवारात थांबणे म्हणजे, श्वसनाच्या आजाराला निमंत्रण देणारे ठरत आहे. बसस्थानकाचा प्रथमदर्शनी भाग पूर्णपणे उखडला आहे.उखडलेल्या गिट्टीमुळे बस चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. टायरमुळे उडालेली गिट्टी एखाद्याच्या टाळक्यात बसून मोठा अपघात होण्याचीही भीती नाकारता येत नाही. बस बाहेर काढताना खड्ड्यांचा पसारा चुकविताना चालकाचे नियंत्रण सुटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तर प्रवाशांचे कपडे हमखास रंगतात. साचलेल्या पाण्यातून बस भरधाव निघून जाते.खड्डामय बसस्थानकात एसटी बस नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी फेऱ्या रद्द होत आहे. स्वमालकीच्या वस्तूचे नुकसान होत असतानाही एसटी महामंडळ बसस्थानक दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. आता या ख्याती प्राप्त बसस्थानकाला जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नाची गरज आहे.प्रवाशांना थंड ऐवजी कोमट पाणीनेर बसस्थानकावर थंड पाण्याची सोयही करण्याचे सौजन्य महामंडळाने दाखविले नाही. कोमट पाणी पिऊन प्रवाशांना तहान भागवावी लागते. बसस्थानकातील अनेक पंखे बंद आहेत. उकाड्यात बसून बसची प्रतीक्षा करावी लागते. साऊंड सिस्टीम बंद असल्याने प्रवाशांना फलाटावर लागलेल्या बसची माहिती मिळत नाही. बाहेरून एखादी बस आल्यास धावत जाऊन फलक पाहण्यासाठी प्रवाशांची धडपड असते. अनेक समस्यांनी या बसस्थानकाला ग्रासले आहे. यातून केव्हा बाहेर पडेल याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे.