नगरसेवकाची मागणी : पांढरकवडा नगरपरिषदेनेही घेतला ठरावपांढरकवडा : ग्रामीण भागाप्रमाणे शहरातील आदिवासी भागातील आदिवासी बांधवांनासुध्दा शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकअंकीत नैताम यांनी केली आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतसुध्दा त्यांनी ही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचा ठराव नगरपरिषदेच्या सभागृहात घेण्यात आला असून याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे.ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र ग्रामीण भागाप्रमाणे शहरामध्येसुध्दा मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतात. दारिद्र रेषेखाली येणाऱ्या आदिवासी बांधवांना शहरातील महाग घरे किंवा प्लॉट घेता येत नाही. त्यामुळे शासनाने अशा गरीब आदिवासींना या शबरी योजनेतून घरकुल मंजूर मंजूर करावे, हा विषय अंकीत नैताम यांनी सभेमध्ये मांडला. त्यांच्या या विषयाला सर्व नगरसेवकांनी समर्थन दिले. नगराध्यक्षा वंदना रॉय यांनी अध्यक्षाच्या परवानगीने मंजूर करुन तसा ठराव आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठविला. अकीत नैताम यांनी याबाबतचे निवेदन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनासुध्दा दिले होते. किशोर तिवारी यांनी या निवेदनाची दखल घेऊन आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव व मंत्री विष्णू सावरा यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगननेनुसार ३१ हजार असून यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या चार हजार ३२५ आहे. आज ही संख्या पाच हजारच्यावर गेली आहे. यामध्ये दारिद्र रेषेखाली व एक लाख रूपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने शहरामध्ये आदिवासींच्या वेगवेगळ्या वस्त्या असून त्यामध्ये गोंड परधान, कोलाम अशा विविध जातीचे आदिवासी बांधव राहतात. त्यांना पक्के घरे नाहीत. गरजू कुटुंबांना शासनाकडून या योजनेअंतर्गत घरकुल मिळावे, अशी मागणी नगरसेवक अंकीत नैताम यांनी निवेदनातून शासनाकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शहरी आदिवासींना शबरी घरकूल योजनेचा लाभ द्यावा
By admin | Updated: January 13, 2017 01:37 IST