शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदीत सावळा गोंधळ

By admin | Updated: March 19, 2017 01:31 IST

येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माल खरेदी

शेतकऱ्यांना नकार : कार्यकर्त्यांच्या मालाला प्राधान्य पुसद : येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांचा माल प्राधान्याने घेण्याकडे कल वाढीस लागला आहे. या प्रकारामुळे खरेदीसाठी तासन्तास ताटकळत बसणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित तुरीला हमी भाव मिळावा म्हणून पुसद शहरात नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र आवक वाढल्याने या खरेदी केंद्रावरील नियोजन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. तुरीचे मोजमाप करताना वशिलेबाजी केली जात आहे. सात-सात दिवस ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. सध्या सुगीचे दिवस असले तरी शेतकरी शेतातील कामे सोडून तूर विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुक्काम ठोकून आहेत. येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून विविध समस्या पुढे केल्या जात आहे. कधी बारदाना नसल्याने तर कधी पणन मंडळाच्या वेअर हाऊसमधील अडचणीमुळे केंद्र बंद राहात आहे. अनेकदा तर हमाल नसल्यामुळेही केंद्र बंद ठेवले गेले. आठवडाभर खरेदी बंद राहात असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवावा लागत आहे. मालाच्या राखणीसाठी शेतकऱ्यांना उघड्यावरच रात्र जागून काढावी लागत आहे. मागील काही दिवसांपासून माप सुरळीत सुरू झाले तरी त्यासाठीही वशिलेबाजी होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. सहा दिवसांपासून तूर खरेदीच झालेली नाही. अद्यापही पाच ते सहा हजार क्विंटल तूर मोजमापाविना बाजार समितीच्या आवारात पडून आहे. संंबंधितांनी याकडे लक्ष देऊन वेळेवर तुरीचे मोजमाप करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)