शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी तालुक्यातील २३ गावांत तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

नदी, नाले कोरडे पडले आहे. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. तूर्तास २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावांतील ग्रामपंचायतींनी टंचाईवर मात करण्यासाठी गावाशेजारी पाणी असणाऱ्या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. आता हे प्रस्ताव तहसीलकडे पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देविहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव : सुधाकरनगरमध्ये टँकरने पुरवठा

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : मे महिना लागताच तापमानात वाढ होत आहे. दिवसेंदिवस पारा चढत आहे. तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, बोअर, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटू लागल्या आहे. त्यामुळे तालुक्यातील २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.तालुक््यात पाणी पातळी खोल जात आहे. नदी, नाले कोरडे पडले आहे. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. तूर्तास २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावांतील ग्रामपंचायतींनी टंचाईवर मात करण्यासाठी गावाशेजारी पाणी असणाऱ्या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. आता हे प्रस्ताव तहसीलकडे पाठविण्यात आले आहे.तालुक्यातून अरुणावती, पैनगंगा, अडाण या तीन मुख्य नद्या वाहतात. या तिनही नदी पात्रातील पाणी कमी होत आहे. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. कापेश्वर, आमणी, बोरगाव, अंबोडा, तरोडा, धनसिंग हेटी, लोनबेहळ, गणगाव, साखरतांडा, सुधाकरनगर, कोसदणी, शिवर, भंडारी, सावळी-सदोबा, जांब, कुऱ्हा, डुमणी, मुकिंदपूर, भानसरा, वरूड तुका, देऊरवाडी, शिरपूर, कवठाबाजार आदी २३ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तेथील ग्रामपंचायतींनी गावाशेजारी पाणी असणाऱ्या खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. यापैकी कापेश्वर, आमणी, बोरगाव दा., अंबोडा, तरोडा आदी १९ गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर झाले आहे.तालुक्यातील पाळोदी, सुधाकरनगर या दोन गावांत तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील ग्रामपंचायतीने गावात टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता. यातील सुधाकरनगर येथे १८ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.७५ लाखांचा कृती आराखडातालुक्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. त्यामुळे यंदा तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पंचायत समितीने पाणीटंचाई उपाययोजनांसाठी ७४ लाख ७६ हजारांचा कृती आराखडा तयार केल्याची माहिती गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिली. दरम्यान, ११ गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहित करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई