शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन रविवारी

By admin | Updated: February 22, 2017 01:19 IST

आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा नॅशनल आंबेडकराईट गार्डच्या संयुक्त विद्यमाने सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन

लोकनाथ यशवंत उद्घाटक : परिसंवाद, परिचर्चा व आंबेडकरी लोकन्यायालय यवतमाळ : आंबेडकरी साहित्य व कला अकादमी तथा नॅशनल आंबेडकराईट गार्डच्या संयुक्त विद्यमाने सातवे आंबेडकरी युवा साहित्य संमेलन रविवारी २६ फेब्रुवारी रोजी यवतमाळात होऊ घातले आहे. संदीप मंगल्ममध्ये या संमेलनाचे सकाळी १० वाजता प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी आयोजनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. संमेलन परिसरातला रोहित वेमुला, सभागृहास नामदेव ढसाळ, तर विचारमंचाला अरुण काळे नाव देण्यात आले असून छत्रपती संभाजी राजे, मुक्ता साळवे, बिरसा मुंडा व फातिमा शेख आदी प्रवेशद्वार राहणार आहेत. संमेलनाध्यक्ष डॉ. मंगेश बनसोड, विशेष अतिथी सिनेकलावंत मिलिंद शिंदे, संपादक राही भिडे, प्रा. डॉ. महेंद्र भवरे, प्रा. सतेश्वर मोरे, प्रा. माधव सरकुंडे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष नंदकुमार रामटेके, अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक संचालक विनय ठमके, मुख्याधिकारी सुदाम धुपे, अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त जयंत वाणे, सहायक करमणूक करअधिकारी अजय गौरकार, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आंबेडकरी साहित्यनिर्मिती प्रक्रियेतील महिलांची सहभागिता : आव्हाने व उपाय या विषयावर राही भिडे यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद होणार आहे. ‘आंबेडकरी चळवळ आणि आम्ही’ या विषयावर आंबेडकरी लोकन्यायालय हा अभिनव उपक्रमही राबविला जाणार आहे. अ‍ॅड. गोविंद बनसोड न्यायाधीश म्हणून काम पाहतील. तर सुनिल वासनिक व संजय ढोले अधिवक्ता असतील. प्रा. डॉ. अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर परिचर्चा होणार आहे. शिवाय, ‘आंबेडकरी ड्रामेबाज ग्रुप’ तसेच ‘युवा द रिफॉर्मिस्ट युथ असोसिएशन’ दोन नाटकांचे सादरीकरण करणार आहे. डॉ. मंगेश बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली रात्री ८ वाजता समारोप होईल. समारोपीय कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संदेश ढोले असतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला अकादमीचे आनंद गायकवाड, कवडूजी नगराळे, गोपीचंद कांबळे, डॉ. साहेबराव कदम, सुमेध ठमके, मंगला जाधव, वैशाली ढगे, दत्ता हाडके, रवी बरडे, डॉ. सुभाष जमधाडे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)