शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

दोन वनपालांसह सात जण निलंबित

By admin | Updated: August 27, 2014 23:51 IST

राखीव वनात शेकडो परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करीच्या प्रकरणात दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता दोन क्षेत्रसहायकासह चौकीदार आणि वनरक्षक अशा

यवतमाळ : राखीव वनात शेकडो परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करीच्या प्रकरणात दोन वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर आता दोन क्षेत्रसहायकासह चौकीदार आणि वनरक्षक अशा सात जणांना यवतमाळ वनवृत्ताचे मुख्यवनसंरक्षक व्ही. व्ही. गुरमे यांनी तडकाफडकी निलंबित केले. यासंबंधीचे आदेश मंगळवारी सायंकाळी काढण्यात आले. या कारवाईने खळबळ उडाली आहे.मनपूरचे क्षेत्रसहायक जी. के. लुटे, वनरक्षक आर.डी. कुमरे, जी.पी.जाधव, चौकीदार आर.टी. ढबाले, साखराचे क्षेत्रसहायक शेख कय्यूम, वनरक्षक सोनटक्के आणि चौकीदाराचा निलंबनात समावेश आहे. हिवरी वन परिक्षेत्रातील मनपूर राऊंडमधील राखीव वनात शेकडो परिपक्व सागवान वृक्षांवर कुऱ्हाड चालवून तस्करांनी कत्तल केली. कत्तलीतील लाखो रूपये किमतीचा लाकूडसाठा वाहून नेताना ट्रक फसल्याने तस्करांनी पोबारा केला. तत्पूर्वी मनपूर राऊंडमधूनच शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी करण्यात आली. हाच प्रकार घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा बिटमध्येही झाला. या घटनेची शाही वाळते न् वाळते तोच पुसद वन परिक्षेत्रातील खंडाळा बिटमध्ये ट्रक फसल्याने सागवान लाकडाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. या तिनही घटना गांर्भियाने घेत दोन दिवसांपूर्वी घाटंजी वन परिक्षेत्र अधिकारी आर.एन.मंचाळ आणि हिवरी वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एच. मोहीते यांना निलंबित करण्यात आले होते. (स्थानिक प्रतिनिधी)