वीज कार्यालय : तीन दिवसांचा पीसीआरयवतमाळ : वीज पुरवठा सुरळीत का केला नाही असे म्हणत सोमवारी रात्री वीज वितरणच्या शहर कार्यालयात तोडफोड करून कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या येथील विदर्भ हाऊसिंग परिसरातील सात तरुणांना वडगाव रोड पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.येथील विदर्भ हाऊसिंग परिसरात हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या भागातील वीज पुरवठा खंडित होता. त्यामुळे काही युवक वीज वितरण कंपनीच्या यवतमाळ शहर कार्यालयात जाब विचारण्यासाठी सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पोहोचले. विद्युत सहायक दिनेशकुमार ब्रिजलाल मानकर, प्रमोद चिलकावार या ठिकाणी उपस्थित होते. संतप्त तरुणांनी या दोघांंना मारहाण करून कार्यालयातील खुर्च्या, टेबल, लाईटची तोडफोड केली. या घटनेची माहिती पोलिसांना देताच काही मिनिटातच वडगाव रोडचे ठाणेदार बाळकृष्ण जाधव ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळीही जमावाकडून तोडफोड सुरू होती. पोलीस पाहताच अनेकांनी पळ काढला. मात्र सात तरुणांना पोलिसांनी अटक केली. त्यात अक्षय मोहन डुबरे (१९), अक्षय चंद्रकुमार बुलबुले (२३), सुरज मुरलीधर बांद्रे (२५), किशोर निळकंठराव कांबळी (२६), कुणाल राजनारायण यादव (२०), शुभम संजय सोनकर (२०), निरज सुरेंद्र येवतीकर (२१) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले. (कार्यालय प्रतिनिधी)
तोडफोडप्रकरणी सात जणांना अटक
By admin | Updated: April 27, 2016 02:35 IST