शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

कंत्राटदारांच्या देयकात सात कोटी कपात

By admin | Updated: August 19, 2015 02:40 IST

बाजारात बांधकाम साहित्याचे दर कमी असताना ‘डीएसआर’च्या आडोश्याने ते जादा आकारुन शासनाची फसवणूक करण्याचा डाव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांनी उधळून लावला.

शासनाचा निधी वाचविला : ‘डीएसआर’ तपासणीत आढळला जादा दराचा गोंधळ यवतमाळ : बाजारात बांधकाम साहित्याचे दर कमी असताना ‘डीएसआर’च्या आडोश्याने ते जादा आकारुन शासनाची फसवणूक करण्याचा डाव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांनी उधळून लावला. या प्रकरणात कंत्राटदारांच्या देयकात सुमारे सात कोटी रुपयांची कपात करून ही रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत दरवर्षी रस्ते, इमारती, पूल व अन्य बांधकामांच्या निविदा काढल्या जातात. या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर (डीएसआर) शासनाने निश्चित केलेले आहे. निविदा काढताना हे दर डोळ्यापुढे ठेऊन अंदाजपत्रक बनविले जाते. मात्र अंतिम देयक निश्चित करताना ‘डीएसआर’ आणि बाजारातील बांधकाम साहित्याचे प्रत्यक्ष दर तपासण्याचे निर्देश आहेत. परंतु बहुतांश वेळा बांधकाम अभियंते हे दर तपासणीच्या भानगडीत पडत नाहीत. कंत्राटदारांशी असलेले सलोख्याचे संबंध त्यासाठी कारणीभूत ठरतात. बाजारात भाव कमी असताना ‘डीएसआर’नुसार बांधकाम साहित्याचे दर मंजूर करून देयक दिले जाते. यात शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र त्याच वेळी कंत्राटदाराचा तेवढ्या रकमेचा फायदा होतो. लाभाच्या या रकमेत बांधकाम खात्यातील अभियंता, लेखा विभाग, लिपिकवर्गीय यंत्रणा अनेकदा ‘वाटेकरी’ असते. गेल्या कित्येक वर्षांपासून लाभाचे हे उपक्रम सार्वजनिक बांधकाम खात्यात वणीपासून उमरखेडपर्यंत सुरू आहे. परंतु पुसदमध्ये दोन महिन्यांपूर्वी कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झालेल्या खुशालराव पाडेवार यांनी या लाभाच्या उपक्रमांना चाप बसविला. यापूर्वीच्या अभियंत्याच्या काळात प्राप्त झालेल्या देयकातील ‘डीएसआर’ व बांधकाम साहित्याचे बाजारभाव पाडेवार यांनी तपासले. त्यात तब्बल अडीच कोटी रुपये कंत्राटदारांच्या देयकातून कपात करण्यात आली. ही रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली. पाडेवार यांच्या याच पुसद पॅटर्नची दखल अमरावतीचे मुख्य अभियंता सी.व्ही. तुंगे, यवतमाळचे अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के यांनी घेतली. त्यांनी अशाच पद्धतीने यवतमाळ, पांढरकवडा व विशेष प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना बांधकाम साहित्याच्या दराची तपासणी करण्याचे निर्देश दिले. या तपासणीत चार विभागामिळून कंत्राटदारांची एकूण सहा कोटी ९७ लाख रुपयांची देयके कपात केली गेली आहे. अर्थात कंत्राटदारांच्या तिजोरीत जाणारी ही रक्कम (सीई आणि एसर्इंच्या आदेशानंतर का होईना) कार्यकारी अभियंत्यांच्या सतर्कतेमुळे आता शासनाच्या तिजोरीत जाणार आहे. या अभियंत्यांनी शासनाचा हा महसूल वाचविला आहे. त्यामध्ये सर्वाधिक अडीच कोटी रुपये पुसद विभागातील आहे. त्या खालोखाल विशेष प्रकल्प विभाग १ कोटी ६३ लाख, पांढरकवडा १ कोटी ५० लाख तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यवतमाळ येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाने वाचविलेल्या १ कोटी ३४ लाखांच्या रकमेचा समावेश आहे. बांधकाम अभियंत्यांनी सतर्कता राखून कंत्राटदारांना जाणारे तब्बल सात कोटी रुपये वाचविल्याने कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. या अभियंत्यांचा प्रामाणिकपणा पुढेही कायम राहिल्यास कंत्राटदारांची चांगलीच आर्थिक नाकेबंदी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)