शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये साकारणार सात कोटींचे वन भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:26 IST

येथील पोलीस ठाण्यासमोर असलेली वन कर्मचाऱ्यांची शिकस्त इमारत पाडून त्या जागेवर प्रशस्त वन भवन उभारले जाणार आहे. त्याचे बजेट सात कोटी ४० लाख रुपये एवढे आहे.

ठळक मुद्देकार्यालये-निवासस्थाने : सार्वजनिक बांधकाम खात्याला निधी वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील पोलीस ठाण्यासमोर असलेली वन कर्मचाऱ्यांची शिकस्त इमारत पाडून त्या जागेवर प्रशस्त वन भवन उभारले जाणार आहे. त्याचे बजेट सात कोटी ४० लाख रुपये एवढे आहे.पुसदला नगरपरिषदेजवळ वन कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. १२ फेब्रुवारी १९६४ ला पुसद येथे विभागीय वन अधिकारी कार्यालय स्थापन झाले होते. पी.पी. लेले हे पहिले विभागीय वन अधिकारी होते. १९६४ ला बांधलेली ही वसाहत आता जीर्ण झाली आहे. तरीही जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांचे कुटुंब तेथे राहते. हीच शिकस्त इमारत पूर्णत: पाडून तेथे नव्याने तीन मजली इमारत वन भवन म्हणून उभारली जाणार आहे. त्यात उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, भरारी पथक आदींची कार्यालये राहणार आहेत. याशिवाय अधिकाºयांचे निवासस्थान, किमान १४ कर्मचाऱ्यांचे कुटुंब राहू शकतील, अशी निवासस्थाने समाविष्ठ आहेत.सात कोटी २४ लाख २९ हजार रुपये बजेट असलेल्या या वन भवनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपवनसंरक्षक कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपवनसंरक्षक अरविंद मुंढे (आयएफएस) यांनी हा संपूर्ण निधी पुसदच्या कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे ७ डिसेंबर रोजी वर्ग केला आहे. बांधकाम विभागाकडून लवकरच या संबंधीची निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आहे. यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण, पुसदचे डीएफओ अरविंद मुंढे यांचा पाठपुरावा या कामी महत्वाचा ठरला. पुसद येथील वन विभागाचे कार्यालय सध्या भाड्याच्या इमारतीत थाटले आहे.लवकरच हे कार्यालय बांधकामानंतर स्वत:च्या इमारतीत नेले जाणार आहेत. पुसद, दिग्रस, महागाव, उमरखेड या चार तालुक्यांचे वन मुख्यालय पुसदमध्ये आहे. त्या अंतर्गत पुसद, मारवाडी, दिग्रस, काळी दौलत, महागाव, उमरखेड व शेंबाळपिंपरी हे सात वन परिक्षेत्र या वन विभागात समाविष्ट आहेत.