शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

किन्ही गावात शिरलेल्या ट्रकने सात जनावरे चिरडली

By admin | Updated: March 23, 2017 00:17 IST

आर्णी मार्गावरील किन्ही येथे बुधवारी सकाळी भरधाव ट्रकने एका घराला धडक दिली. यात सात जनावरे ठार झाली.

हिवरी : आर्णी मार्गावरील किन्ही येथे बुधवारी सकाळी भरधाव ट्रकने एका घराला धडक दिली. यात सात जनावरे ठार झाली. ट्रक (जीजी १२/बीटी ९५११) ट्रेलरसह आर्णीमार्गे विजयापूर येथून नागपूरकडे जात होता. किन्हीनजिक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगतच्या मोहन दगडूसिंग राठोड यांच्या घराला धडकला. या धडकेत तेथे बांधून असलेल्या दोन म्हशी, तीन गायी आणि दोन बकरे चिरडून जागीच ठार झाले. तीन जनावरे जखमी झाली. मोहन राठोड यांच्या पत्नीसुद्धा या अपघातात जखमी झाल्या. राठोड यांच्या घराचे या अपघातात मोठे नुकसान झाले. सुधाकर मधुकर पवार यांच्याही घराला धडक बसली. यात त्यांच्या घराचेही नुकसान झाले. ट्रक चालक मोहम्मद शाकीरसुद्धा (रा. किसनगड, अजमेर) जखमी झाले. त्यांच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्रेनव्दारे सदर ट्रक व ट्रेलर बाहेर काढण्यासाठी जवळपास दीड तास लागला. तोपर्यंत यवतमाळ ते आर्णी मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. (वार्ताहर)