शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वेतन सुधारणेसाठी समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:59 IST

एसटी कर्मचाºयांच्या वेतनात सुधारणा करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार सोमवारी राज्य शासनामार्फत उच्चाधिकार समिती स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘एसटी’ कामगार : उच्च न्यायालयाची सूचना, २२ डिसेंबरपर्यंत निष्कर्ष सादर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी कर्मचाºयांच्या वेतनात सुधारणा करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार सोमवारी राज्य शासनामार्फत उच्चाधिकार समिती स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये परिवहन विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त आणि कामगार आयुक्त यांचा समावेश आहे.ही समिती १५ नोव्हेंबरपर्यंत एसटी कर्मचाºयांच्या अंतरिम वेतन सुधारणेबाबत विचार करून २२ डिसेंबरपर्यंत आपला अंतिम निष्कर्ष सादर करणार आहे. समितीच्या कार्यकक्षाही निश्चित करण्यात आल्या आहे. सध्याच्या वेतनश्रेणीचा अभ्यास करून महामंडळाच्या कर्मचाºयांचे वेतन व भत्ते निश्चित करण्यासाठी शिफारस, वेतनसंरचनेतील सुधारणेची उत्पादकतेतील वाढीशी सांगड घालणे, सध्या वेतनाखेरीज दिल्या जाणाºया भत्त्यांचे पुनर्विलोकन करुन त्यांचा अंतर्भाव असलेली वेतनसंरचना सुनिश्चित करणे, भत्त्यांचे सुलभीकरण व सुसूत्रिकरण, महामंडळाची आर्थिक स्थिती, वेतनवाढीमुळे प्रवाशांवर होणारी भाडेवाढ आदी बाबी विचारात घेऊन शिफारस करणे, ही या समितीची कार्यकक्षा असणार आहे.कामगारांना अपेक्षित वेतनवाढ द्या !संघटनेने दिलेल्या प्रस्तावामुळे महामंडळावर दरवर्षी सरासरी २१०० कोटी रुपये आर्थिक भार येतो, तर परिवहनमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळ अध्यक्षांनी दिलेल्या प्रस्तावामुळे प्रतिवर्षी सरासरी ११०० कोटी रुपये आर्थिक भार येत आहे. एसटी कामगारांना अपेक्षित वेतनवाढ मिळण्यासाठी कामगार संघटनेने दिलेल्या प्रस्तावावर समाधानकारक निर्णय होणे आवश्यक आहे, असे एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हटले असल्याचे केंद्रीय कार्याध्यक्ष सदाशिव शिवनकर यांनी सांगितले.