सर्वधर्मिय सामूहिक विवाह : सत्यसाई सेवा संघटनेचा उपक्रमयवतमाळ : सत्यसाई सेवा संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सर्वधर्मिय सामूहिक विवाह मेळाव्यात ८३ जोडप्यांचे शुभमंगल रविवारी सायंकाळी पार पडले. पावसाने हजेरी लावून या वधू-वरांना जणू आशीर्वादच दिले. येथील डॉ.भाऊसाहेब नंदूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या श्री सत्यसाई क्रीडानगरीत रविवारी सायंकाळी सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा आयोजित होता. यामध्ये ४२ हिंदू, २ मुस्लिम, ३९ बौद्ध जोडप्यांचा विवाह त्यांच्या धार्मिक रितीरिवाजानुसार पार पडला. प्रमुख पाहुणे पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, आमदार माणिकराव ठाकरे, आयोजक डॉ.प्रकाश नंदूरकर, सत्यसाई सेवा संघटनेचे अनुप सक्सेना, मृणाल सक्सेना, मुकेश पटेल, प्रा.सातपुते उपस्थित होते. दरम्यान लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी या सोहळ्याला भेट दिली. गत २१ वर्षांपासून यवतमाळात या सामूहिक विवाह मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले जात आहे. सायंकाळी आयोजित या विवाह सोहळ्यावर वादळी पावसाचे ढग होते. अशा स्थितीतही आयोजकांनी हा विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडला. विवाह सोहळ्यात सुमारे दहा हजार वऱ्हाडी सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)
यूजीसी बरखास्त केल्यास गंभीर परिणाम
By admin | Updated: April 14, 2015 01:41 IST